टोल दरवाढीमुळे एसटीला बसणार ३ ते ४ कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 05:13 AM2020-03-01T05:13:39+5:302020-03-01T05:13:46+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस वे) वर १ एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ होणार आहे.

The toll hike will hit the ST of Rs 6-8 crore | टोल दरवाढीमुळे एसटीला बसणार ३ ते ४ कोटींचा फटका

टोल दरवाढीमुळे एसटीला बसणार ३ ते ४ कोटींचा फटका

Next

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस वे) वर १ एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून धावणाऱ्या एसटीला एका फेरीसाठी १२२ रुपये ज्यादा मोजावे लागतील. परिणामी, एसटी महामंडळाला वर्षाला सरासरी ३ ते ४ कोटींचा फटका बसणार आहे.
सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका फेरीसाठी ६७५ रुपये, तर मुंबई-पुणे-मुंबई या मार्गासाठी १ हजार ३५० रुपये टोल भरावा लागतो. मात्र टोलमध्ये दरवाढ झाल्यानंतर १ एप्रिलपासून एका फेरीसाठी १२२ आणि मुंबई-पुणे-मुंबई मार्गासाठी २४४ रुपये मोजावे लागतील. म्हणजे दोन फेऱ्यांसाठी एकूण १ हजार ५९४ रुपये मोजावे लागतील. मुंबई-पुणे महामार्गावर दिवसाला सरासरी ७०० ते ८०० फेºया होतात. परिणामी, एसटीच्या तिजोरीतून एका दिवसाला दीड ते दोन लाख जादा मोजावे लागतील. त्यामुळे वर्षाला सरासरी ३ ते ४ कोटींचा फटका बसेल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प (अंदाजित) जाहीर झाला आहे. यामध्ये एसटीसाठी १० हजार ४६७ कोटींची मंजुरी मिळाली. या अर्थसंकल्पात एसटीला ८०२.०३ कोटींचा तोटा अपेक्षित आहे. यासह एसटीचा संचित तोटा ५ हजार कोटींपेक्षा जास्त झाला आहे. त्यातच आता टोल दरवाढीचा फटका बसल्याने अपेक्षित तोटा वाढेल.
> तिकीट दरात बदल नाहीत
एसटीला राज्यभरातून वर्षाला १४६ कोटींचा टोल भरावा लागतो. याचा भार एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडतो. मात्र कर्नाटक राज्यातील एसटी महामंडळ प्रवाशांच्या तिकिटाच्या रकमेतून टोल वसूल करते. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरवाढीनंतर प्रवाशांच्या खिशातून ही रक्कम वसूल केली जाईल का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. कारण या टोल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसणार आहे. मात्र असे असले तरी तिकीट दरात कोणतेही बदल केले नसल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

Web Title: The toll hike will hit the ST of Rs 6-8 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.