Join us

टोल बंदोबस्ताची रक्कम थकीत

By admin | Published: November 24, 2014 10:46 PM

12क्क् कोटी रु पये खर्चून उभारलेल्या सायन - पनवेल महामार्गावरील खारघर येथील टोलनाका सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोव:यात सापडला आहे.

वैभव गायकर ल्ल नवी मुंबई
12क्क् कोटी रु पये खर्चून उभारलेल्या सायन - पनवेल महामार्गावरील खारघर येथील टोलनाका सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोव:यात सापडला आहे. टोलनाक्याला विरोध करण्यासाठी झालेल्या राजकीय आंदोलनासाठी घेतलेल्या पोलीस बंदोबस्ताची रक्कम टोल प्रशासनाने फेडली नसल्याचे पुढे आले आहे. 
सायन - पनवेल महामार्गावरील खारघर येथील टोलनाक्यावरून पनवेलमध्ये राजकारण चांगलेच तापले होते. तत्कालीन विधानसभेचे संपूर्ण राजकारण खारघर टोलभोवती फिरत राहिले. टोलनाका रद्द करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष पुढे सरसावले व त्यासाठी आंदोलनेही झाली. या पक्षामध्ये कॉंग्रेस, शेकाप, भाजपा,समाजवादी पार्टी, आरपीआय, राष्ट्रवादी, मनसे यांच्यासह अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. याचा धसका घेत सायन - पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या टोल कंपनीने याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला. 
याठिकाणी उभारलेला टोलनाका  व याठिकाणच्या कर्मचारी वर्गाच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे कोणतीच अनुचित घटना घडली नाही, मात्र या बंदोबस्तासाठी दिवसरात्र राबलेल्या पोलिसांची सहा लाख रुपयांची रक्कम मात्र टोल प्रशासनाने मागील काही महिन्यांपासून थकवलेली आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून बंदोबस्ताची सहा लाख रुपयांची रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. 
सायन - पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिकारी उमेश सोनावणो यांनी, खारघर पोलीस ठाण्याची बंदोबस्ताची रक्कम यापूर्वीच दिल्याचे सांगितले. दोन्ही प्रतिक्रियांवरून पोलीस व टोल कंपनीमध्ये समन्वय नसल्याचे उघड झाले आहे. 
 
स्थानिकांना सूट!
4खारघर टोलनाका कोपरा गाव व कामोठे याठिकाणी आहे. टोल नाका रद्द करावा व स्थानिकांना टोलमधून सूट द्यावी, या मागणीसाठी तत्कालीन सत्ताधारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यावेळी कॉंग्रेस सरकार विरोधात बंड पुकारले होते. 
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या पोलीस बंदोबस्ताची सहा लाख रुपये ही रक्कम खारघर पोलीस ठाण्याला मिळाली नाही. याबाबत वरिष्ठांनाही माहिती देण्यात आली आहे . 
- पंढरी पाटील 
 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर. 
 
पोलीस बंदोबस्ताची जी काही रक्कम होती, ती आम्ही दिलेली आहे. आमच्याकडे एकही रु पया शिल्लक नाही
- उमेश सोनावणो, 
सायन-पनवेल टोलवेज प्रा. लि.