टोमॅटो झाले लालेलाल; किरकोळ मार्केटमध्ये ६० रुपयांवर दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 08:04 AM2023-11-23T08:04:02+5:302023-11-23T08:04:15+5:30

मुंबईत तुटवडा, किरकोळ मार्केटमध्ये ६० रुपयांवर दर

Tomatoes turned red; 60 in the retail market at Rs | टोमॅटो झाले लालेलाल; किरकोळ मार्केटमध्ये ६० रुपयांवर दर

टोमॅटो झाले लालेलाल; किरकोळ मार्केटमध्ये ६० रुपयांवर दर

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्यात सर्वत्र टोमॅटोचे उत्पादन कमी झाले आहे. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये सध्या टोमॅटो १२ ते ३५ रुपये आणि किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये दराने विकला जात आहे. राज्यातील इतर बाजार समितींमध्येही दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. 

मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी १७० टन टोमॅटोची आवक झाली. महिन्याभरापूर्वी बाजार समितीमध्ये टोमॅटोला ८ ते १४ रुपये दर मिळत होता. १० दिवसांपूर्वी १४ ते २४ रुपये किलोने विक्री सुरू होती. बुधवारी हेच दर १२ ते ३५ रुपये किलोवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये दराने टोमॅटोची विक्री होत आहे. सद्यस्थितीमध्ये नाशिक परिसरातून आवक जास्त होत आहे. 

राज्यातील प्रमुख बाजार समितींमधील होलसेल दर

पुणे    १८ ते ४०
मुंबई    १२ ते ३५
कोल्हापूर    १० ते ३०
छत्रपती संभाजीनगर    १२ ते ३०
कल्याण    ३४ ते ४०
सोलापूर    ३ ते २५
नागपूर    १५ ते २५

    सातारा, सोलापूर, पुणे परिसरातील आवक कमी झाली आहे. राज्यात सर्वच बाजार समितीमध्ये आवक कमी झाली आहे. 
    बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की, १० दिवसांपासून आवक कमी झाली असून त्यामुळे दर वाढत आहेत.

Web Title: Tomatoes turned red; 60 in the retail market at Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.