‘बीएफएसआय’ क्षेत्रातील प्रगती आणि व्यावसायिक संधींवर उद्या वेबिनार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 04:29 AM2020-06-24T04:29:15+5:302020-06-24T04:29:22+5:30

बँकिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (बीएफएसआय) या क्षेत्रात झालेली प्रगती तसेच त्यात असलेली व्यावसायिक संधी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

Tomorrow webinar on progress and business opportunities in the field of ‘BFSI’ | ‘बीएफएसआय’ क्षेत्रातील प्रगती आणि व्यावसायिक संधींवर उद्या वेबिनार

‘बीएफएसआय’ क्षेत्रातील प्रगती आणि व्यावसायिक संधींवर उद्या वेबिनार

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे भारतातील विविध क्षेत्रांवर आर्थिक परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी सरकारतर्फे अनेक पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध होऊन त्याचा सकारात्मक परिणामही दिसू लागला आहे. बँकिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (बीएफएसआय) या क्षेत्रात झालेली प्रगती तसेच त्यात असलेली व्यावसायिक संधी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताची अर्थव्यवस्था आधीच मंदावलेली असताना त्यात कोविड १९ चा उद्रेक झाला. यामुळे बीएफएसआय क्षेत्रावर प्रचंड दबाव आला व आर्थिक व्यवस्थापन अधिकच आव्हानात्मक झाले. बीएफएसआय क्षेत्रातील व्यक्ती तसेच व्यवसाय मालकांनी पुढील आव्हानांना सामोरे
जाऊन प्रगती कशी करावी? यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
पूनावाला फायनान्सचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीए अभय भुतडा, इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियाचे अध्यक्ष अतुलकुमार गुप्ता आणि रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे
माजी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा या तज्ज्ञांचे या वेबिनारमध्ये मार्गदर्शन लाभणार आहे.
या वेबिनारमध्ये
सहभागी होण्यासाठी https://bit.ly/LokmatBFSIWebinar या लिंकवर नोंदणी करा.
कधी : २५ जून
सायंकाळी : ४ वाजता

Web Title: Tomorrow webinar on progress and business opportunities in the field of ‘BFSI’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.