मुंबई : फॅशनजगतात चर्चेचा विषय ठरलेल्या मिस्टर अॅण्ड मिस ‘फॅशनिस्टा’ची चुरस शिगेला पोहोचली आहे. कारण ‘फॅशनिस्टा’ची अंतिम फेरी १६ फेब्रुवारीला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी रंगणार आहे. अंतिम फेरीच्या पूर्वतयारीसाठी स्पर्धकांना ‘फॅशनिस्टा’ची ब्रँड अॅम्बेसिडर व अभिनेत्री पूजा सावंत हिने मंगळवारी खास तिच्या शैलीत मार्गदर्शन केले. तुषार नॅशनल हेअर अॅण्ड ब्युटी अॅकॅडमीने ‘फॅशनिस्टा’चे आयोजन केले असून लोकमत ‘सखी मंच’ या इव्हेंटचे मीडिया पार्टनर आहे.याआधी मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक आणि राज्याच्या विविध ठिकाणांहून फॅशनिस्टात सामील होण्यासाठी तरुण व तरुणींनी आॅडिशनमध्ये शेकडोंच्या संख्येने भाग घेतला होता. त्यामधील एकूण २० मुले व २० मुलींची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. या स्पर्धकांचे ग्रुमिंग १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान झाले. फॅशनिस्टाचे आयोजक व हेअरस्टाईलिस्ट तुषार चव्हाण यांनी सांगितले की, अंतिम फेरीत स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढावा, म्हणून ही पूर्वतयारी घेण्यात आली. आपल्या अॅटिट्यूडसह स्टेजवर वावरण्याचा अंदाज, प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत या सर्वच गोष्टींबाबत माहिती देण्यात आली. अभिनेता सुशांत शेलार यानेही बुधवारी फिनालेमधील स्पर्धकांना टीप्स दिल्या.पूर्वी भावे आणि ओमप्रकाश शिंदे हे सेलिब्रिटी अँकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. त्यांचे कॉस्च्यूम डिझायनिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली विधी ठक्कर शुक्ला करणार आहे.तीन दिवसांच्या ग्रुमिंग सेशनमध्ये इंटरनॅशनल पर्सनॅलिटी डेव्हलमेंट एक्स्पर्ट सायमन डेव्हिड्स यांनी स्पर्धकांना टीप्स दिल्या. मयूर वैद्य यांनी स्पर्धकांना नृत्य शैलीचे धडे दिले. ग्रँड फिनालेच्या मेकअप आणि हेअरस्टाईलची जबाबदारी तुषार नॅशनल हेअर अॅण्ड ब्युटी अॅकॅडमीचे एक्स्पर्ट प्रवीण झावीर, अमित कदम, सिद्धेश चव्हाण, संपदा नार्वेकर, मिलिंद चव्हाण करतील.संपूर्ण इव्हेंटची कोरियोग्राफी कोरियोग्राफर भूषण मालंडकर करतील. तर मुलांच्या ट्रॅडिशनल राउंडच्या ड्रेस डिझाईनचे काम अनिकेत हंदळकर करणार आहेत.असा रंगणार ग्रँड फिनाले!शुक्रवारी होणाºया ग्रँड फिनालेला ट्रॅडिशनल राउंड आणि इंडो-वेस्टर्न राउंडमध्ये एकूण ४० स्पर्धकांपैकी प्रत्येकी १० मुले व १० मुली अशा एकूण २० स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनाले रंगेल.कोरियोग्राफर मयूर वैद्य याच्या ग्रुपद्वारे सादर केल्या जाणाºया ‘गणेशवंदना’ने फॅशनिस्टाची सुरुवात होईल.एकूण २० स्पर्धकांमधून प्रमुख विजेत्यांसह प्रत्येकी दोन मुले आणि दोन मुलींची निवड उपविजेते म्हणून केली जाईल.‘बेस्ट स्माइल’, ‘बेस्ट हेअर’, ‘बेस्ट पर्सनॅलिटी’ आणि ‘पॉप्युलर फेस आॅन फेसबुक’ या अॅवॉडर््सचाही इव्हेंटमध्ये समावेश आहे.गायिका माधुरी नारकर यांच्या लाइव्ह परफॉर्मन्सने ग्रँड फिनालेची रंगत वाढेल.अॅडगुरू भरत दाभोलकर हे फॅशनिस्टाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.मॉडेलिंगच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल करावा लागतो. म्हणून स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न मी केला. मॉडेलिंगमध्ये एक प्लॅटफॉर्म मिळणे गरजेचे आहे. तो प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न फॅशनिस्टा करत आहे. म्हणून या शोमध्ये सामील होण्याचा निर्णय मी घेतला आहे. - पूजा सावंत, अभिनेत्री-ब्रँड अॅम्बेसिडर
उद्या ठरणार ‘मिस्टर अॅण्ड मिस फॅशनिस्टा’! पूजा सावंतने घेतली स्पर्धकांची पूर्वतयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:47 AM