Join us

आज रात्रकालीन ब्लॉक, उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 5:59 AM

घाटकोपर स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी मध्यरात्री ६ तासांचा रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे.

आज रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : घाटकोपर स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी मध्यरात्री ६ तासांचा रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक काळात मांडवी आणि उद्यान एक्स्प्रेसच्या वेळेत बदल केले असून, चार एक्स्प्रेस दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.शनिवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटे ते रविवारी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत डाउन जलद मार्गावर घाटकोपर स्थानकात पुलाचे गर्डर टाकण्याचे काम होईल. या काळात दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी वाहतूक अप धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. ७ वाजून १० मिनिटांनी सुटणारी मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस ब्लॉकमुळे ८ वाजून ५ मिनिटांनी सुटेल, तर मुंबई-बंगळूर उद्यान एक्स्प्रेस ९ वाजून ५ मिनिटांनी सुटेल. कन्याकुमारी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी एक्स्प्रेस आणि सिंकदराबाद एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत धावेल.

मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉकमुंबई : कल्याण-ठाणे मार्गावर अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी पावणे अकरा वाजल्यापासून मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावरही कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी १० वाजून ४८ मिनिटे ते सायंकाळी ४ वाजून १४ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक आहे. या काळात वाहतूक अप धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. यामुळे ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर लोकल उपलब्ध नसेल.हार्बर वरील कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप-डाउन मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालविण्यात येतील.