Join us

कत्तलखान्यात नेताना 21 बैल पकडले

By admin | Published: October 01, 2014 2:39 AM

सरळगाव बाजारातून बेल्हे येथे कत्तलखान्यात नेण्यात येणारे 21 बैल बजरंग दलाच्या कार्यकत्र्यानी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हे बैल तीन टेम्पोमध्ये भरून नेण्यात येत होते.

टोकावडे : सरळगाव बाजारातून बेल्हे येथे कत्तलखान्यात नेण्यात येणारे 21 बैल बजरंग दलाच्या कार्यकत्र्यानी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हे बैल तीन टेम्पोमध्ये भरून नेण्यात येत होते. 
दर मंगळवारी सरळगाव येथे आठवडाबाजार भरतो. या बाजारात भाकड जनावरांसह शेतक:यांना वापरण्यायोग्य बैल विकले जातात. परंतु, अनेकदा येथून नांगर व बैलगाडीसाठी लागणा:या बैलांसह वासरे विकत घेऊन ते कत्तलखान्यात नेले जातात. या बाजारात पोलीस व्हॅन बंदोबस्तासह हजर असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते. मंगळवारीदेखील आठवडाबाजार होता. तिथून शेतक:यांच्या नावाखाली बैल खरेदी करून ते तीन टेम्पोमध्ये भरून बेल्हे (नगर) येथे कत्तलीसाठी बैल नेले जात होते.  बजरंग दलाचे ठाणो जिल्हा विभाग संयोजक दिनेश पाटील, मुरबाड तालुका गोरक्षकप्रमुख प्रमोद देशमुख व भावेश देशमुख यांनी ते पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तक्रार दाखल करण्यात आली असून, बैल आनगाव येथील गोशाळेत नेण्यात आले आहेत. (वार्ताहर)