मुंबईचे टॉप टेन युवा आयकॉन!

By admin | Published: January 12, 2016 03:39 AM2016-01-12T03:39:15+5:302016-01-12T03:39:15+5:30

१२ जानेवारी युवा दिन - स्वामी विवेकानंद यांची जयंती... युवक म्हणजे सळसळते चैतन्य... त्यांच्या आशा-आकांक्षांना बळ देण्यासाठी, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार

Top 10 young icons of Mumbai! | मुंबईचे टॉप टेन युवा आयकॉन!

मुंबईचे टॉप टेन युवा आयकॉन!

Next

१२ जानेवारी युवा दिन - स्वामी विवेकानंद यांची जयंती... युवक म्हणजे सळसळते चैतन्य... त्यांच्या आशा-आकांक्षांना बळ देण्यासाठी, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. ‘युवा नेक्स्ट’ या व्यासपीठाच्या घोषणेसाठी युवा दिनापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. या खास दिवसानिमित्त ‘लोकमत’ने मुंबईतील टॉप टेन युवा आयकॉन्सची निवड केली आहे. विविध क्षेत्रांत
कॉलेजचे नाव गाजवणारे हे कॅम्पसमधील चर्चेतील चेहरे... त्यांच्या वाटचालीला ‘लोकमत’ परिवाराच्या शुभेच्छा...

प थ ना ट्य ते ए कां कि का !
व्हीपीएमआरझेड
सिद्धेश आयरे
उत्तम नट होण्याची मनीषा बाळगलेला सिद्धेश आयरे सध्या महाविद्यालयातील उदयोन्मुख कलाकार आहे. तथापि, त्याच्या गुणांमुळे तो अख्ख्या महाविद्यालयाची शान बनलाय. अवघा ५ वर्षांचा असताना सिद्धेशच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले. मामा-मामीने त्याचे पालनपोषण करताना अभिनयाला प्रोत्साहन दिले. आजपर्यंत सिद्धेशने अनेक एकांकिका, एकपात्री, पथनाट्ये बसविली. त्याने दिग्दर्शित केलेले ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाभारत डॉट कॉम’ हे पथनाट्य १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात सादर केले. ‘गुडमॉर्निंग’, ‘प्रतापगड-एक इतिहास’, ‘स्वप्नांकिका’मधून त्याने अभिनयाची चुणूक दाखवली. यशराज प्रॉडक्शन हाऊससाठी निर्मित-दिग्दर्शित केलेल्या ‘रूममेट’ या एकांकिकेला शांताबाई जोग एकांकिका स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.

प थ ना ट्य ते ए कां कि का !
व्हीपीएमआरझेड
सिद्धेश आयरे
उत्तम नट होण्याची मनीषा बाळगलेला सिद्धेश आयरे सध्या महाविद्यालयातील उदयोन्मुख कलाकार आहे. तथापि, त्याच्या गुणांमुळे तो अख्ख्या महाविद्यालयाची शान बनलाय. अवघा ५ वर्षांचा असताना सिद्धेशच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले. मामा-मामीने त्याचे पालनपोषण करताना अभिनयाला प्रोत्साहन दिले. आजपर्यंत सिद्धेशने अनेक एकांकिका, एकपात्री, पथनाट्ये बसविली. त्याने दिग्दर्शित केलेले ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाभारत डॉट कॉम’ हे पथनाट्य १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात सादर केले. ‘गुडमॉर्निंग’, ‘प्रतापगड-एक इतिहास’, ‘स्वप्नांकिका’मधून त्याने अभिनयाची चुणूक दाखवली. यशराज प्रॉडक्शन हाऊससाठी निर्मित-दिग्दर्शित केलेल्या ‘रूममेट’ या एकांकिकेला शांताबाई जोग एकांकिका स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.

बेसबॉल चॅम्प
डी. जी. रुपारेल
नंदन परब
रुपारेलमधील चर्चेतील चेहरा आहे नंदन विजय परब. विद्यापीठाच्या बेसबॉल आणि सॉफ्टबॉल स्पर्धेत त्याच्या डावपेचांमुळे राज्यस्तरीय चषकावर महाविद्यालयाने गेली ४ वर्षे सातत्याने नाव कोरले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही महाराष्ट्राने विजयी कामगिरी केली. त्याचे नेतृत्वगुण ओळखून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रची धुरा सोपवण्यात आली आणि टीम विजयी झाली. रुपारेलचा तो सर्वोत्कृष्ट विद्यार्थीही ठरला.


रंगों का
शहजादा...
रामनिरंजन झुनझुनवाला
शिवशंकर वेलायुधन
रांगोळी, पेंटिंग, पोस्टर मेकिंग, फेस पेंटिंग वा तत्सम स्पर्धांसाठी विविध महाविद्यालयांमध्ये अव्वल क्रमांक मिळवणारा ही ओळख शिवशंकरने अल्पावधीत बनवली. महाविद्यालयांतर्गत स्पर्धांमध्ये त्याच्या ब्रशने अनेकांना चकित केले. रंगांच्या दुनियेत मुशाफिरी करताना तो अभ्यासातही उत्तम गुण मिळवत आहे.


परिस्थितीवर मात
जी. व्ही.
आचार्य इन्स्टिट्यूट
ऋषिकेश परब
घरची परिस्थिती अत्यंत बेताची, पण शिकून मोठे होऊन आई-वडिलांना सुखात ठेवायचे, या जिद्दीपोटी शिक्षणात मजल-दरमजल करत पुढे येणारा ऋषिकेश सध्या महाविद्यालयातील चर्चेतला चेहरा आहे. वडील सातवी पास, आई दहावी पास आहे. वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते घरीच असतात. परिस्थिती बेताची. मिशन एसक्यूएल या टेक्नोव्हेन्झा फेस्टमध्ये त्याने प्रथम पारितोषिक पटकाविले होते. शिवाय, वेगवेगळ्या शहरातील टेक्नोफेस्टमध्येही भाग घेऊन तंत्रज्ञानविषयक गोष्टी जाणून घेण्याकडे त्याचा अधिक कल असतो.

अभिनयाचा ध्यास
महर्षी दयानंद
आशिष शिंदे
आशिष शिंदेने अभिनयाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. त्याने साकारलेला ‘बाल शिवबा’ अनेकांच्या लक्षात राहिला होता. तेव्हापासूनच तो चर्चेतील चेहरा बनला.
रविकिरण एकांकिका स्पर्धेत ‘त्या दोघी’ नाटकात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला. अमोल कोल्हेसोबत ‘जय शिवाजी’ मालिकेत काम केले. ‘विज्ञान’ शाखा निवडली. अभ्यासही अभिनयाइतकाच महत्त्वाचा आहे, असे तो मानतो. बालकलाकार असताना साकारलेली ‘कृष्ण’ ही भूमिका त्याला अजूनही लक्षात आहे. स्वप्निल जोशीसारखा अष्टपैलू अभिनय त्याला करायचा आहे.

टेबल टेनिस सर्वस्व
के. जे. सोमय्या
पार्थ फणसेकर
पार्थ फणसेकर बीएमएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. चौथीपासूनच त्याला टेबल टेनिसची आवड आहे. वडिलांबरोबर खेळता-खेळता त्याची या खेळाशी गट्टी झाली. त्यानंतर राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने टेबल टेनिसचे धडे गिरवले. त्यांच्या सोबत कतारला जाऊन त्याने प्रशिक्षण घेतले. अथक परिश्रम घेऊन सलग आठ वेळा राज्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले. ठाणे जिल्हा आणि राज्यासाठी कर्णधारपद त्याने भूषवले. विद्यापीठ पातळीवरील एक सुवर्णपदक तसेच चॅम्पियनशिपही त्याने मिळवली. अखिल भारतीय स्पर्धेत त्याने चार कांस्य पदके पटकावली आहेत. सौदी अरेबियातील स्पर्धेतही त्याने चुणूक दाखवली. एमबीए करून ‘टेबल टेनिस
कोच’ होण्याची त्याची इच्छा आहे. येत्या जूनमध्ये पार्थ चीनला टेबल टेनिस स्पर्धेसाठी जाणार आहे.

डिफ्रंटली एबल ‘अझर’
विल्सन
अझरुद्दीन शेख
डोळ्यांनी नाही तर मनाने जग पाहणारा, डिसएबल्ड नव्हे तर डिफ्रंटली एबल असा अझर अंगभूत गुणांमुळे विल्सन कॉलेजचा चर्चेतला चेहरा बनलाय. अझरुद्दीन शेख विल्सन महाविद्यालयात तृतीय वर्ष (इतिहास) शिकतो. दृष्टी अधू असूनही अभ्यास आणि खेळातही तो उत्तम आहे. त्याने फुटबॉल, स्विमिंग, क्रिकेट, बुद्धिबळात सहभागी होऊन, जिंकून स्वत:च्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. किशोर कुमारचा तो चाहता आहे. तो स्वत: उत्तम गातो आणि बासरी वाजवतो. या सगळ्याचे श्रेय तो आपल्या आई-बाबांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना देतो. बऱ्याच नव्या गोष्टी शिकायच्या आहेत असे तो नेहमी म्हणतो.

अभिनय... अभिनय... फक्त अभिनय
एस. के. सोमय्या
पियुष गोखले
पीयूषने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करत अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या आहेत. रवी किरण संस्थेच्या ‘अरेच्चा, कमाल आहे’ या एकांकिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली. या नाटकातूनच त्याला उत्कृष्ट अभिनेता अशी ओळख मिळाली. नाटकासोबतच मालिकांमधील लहान लहान भूमिकाही त्याने केल्या. ‘वीर सावरकर’ लघुपट आणि अनेक जाहिरातींत तो चमकला. शिवाय ‘वचन दिले मी तुला’, ‘कृपासिंधू’, ‘पारिजात - गंध नात्यांचा’, ‘खेळ मांडला’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘हे बंध रेशमाचे’ या मालिकांमधूनही त्याने अभिनयाची चुणूक दाखवली.

अभिनयाचे रोपटे जोपासायचे आहे
रुईया महाविद्यालय
रेशम श्रीवर्धनकर
‘मऱ्हाटमोळा देढ फुटिया’ अर्थात संजय नार्वेकरपासून ‘गोंडस कुहू’ म्हणजेच स्पृहा जोशीपर्यंतच्या रुईयातून घडलेल्या कलावंताच्या पंक्तीत एक नवीन चेहरा आता ओळख निर्माण करू पाहतोय. ती आहे नाट्यवलयमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारी रेशम श्रीवर्धनकर. कला शाखेच्या तिसऱ्या वर्षात ती शिकते. ‘ननैतिक’ एकांकिकेने सुरुवात करत ‘आयुष्य एक होताना..’ यात प्रमुख भूमिका करत आपल्या अभिनयाने राज्यस्तरीय ‘उंबरठ्या’वर तिने नाव कोरले. आयएनटीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी रेशम अभ्यासातदेखील तितकीच हुशार आहे.

राजकारणातून समाजकारणाकडे
चेतना महाविद्यालय
अंबर मिरकर
कॉलेजमध्ये कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करायचे म्हणजे सर्वात आधी नाव येते ते अंबर मिरकरचे. कला
शाखेत तृतीय वर्षात शिकणारा
अंबर शिस्तबद्ध नियोजन आणि व्यवस्थापनात तरबेज आहे. रायफल शूटिंगमध्येही त्याने कॉलेजचे नाव गाजवले आहे. कॉलेजतर्फे राबवल्या जाणाऱ्या समाजहिताच्या कार्यक्रमांचेही तो चोख आयोजन करतो. युनायटेड स्टेट कन्सलटंट जनरल मुंबई-अमेरिकन लायब्ररीमध्ये महाविद्यालयाच्या प्रतिनिधित्वाची जबाबदारीही तो तेवढ्याच चोखपणे पार पाडतोय.

Web Title: Top 10 young icons of Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.