टॉप सिक्युरिटीची ईडीकडे चौकशी लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:04 AM2020-12-07T04:04:31+5:302020-12-07T04:04:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तपास सुरू असलेल्या टॉप्स सिक्युरिटी प्रकरणातील तक्रारदार रमेश अय्यर यांच्यावर मुंबई ...

Top Security filed a case against the ED's inquirer | टॉप सिक्युरिटीची ईडीकडे चौकशी लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

टॉप सिक्युरिटीची ईडीकडे चौकशी लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तपास सुरू असलेल्या टॉप्स सिक्युरिटी प्रकरणातील तक्रारदार रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टॉप्स सिक्युरिटीमध्ये त्यांनी कोट्यवधीचा आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॉप्सचे मालक राहुल नंदा यांनी रमेश अय्यर यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. अय्यर यांनी कंपनीत कार्यरत असताना आर्थिक घोटाळा केल्याने कंपनीला मोठे नुकसान झाल्याचा आरोप नंदा यांनी केला आहे.

रमेश अय्यर तीच व्यक्ती आहे ज्यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर व कार्यालयावर ईडीने छापे टाकले. कंपनीचे मुख्य प्रवर्तक अमित चांडाेळेला अटक केली तर सरनाईक पिता-पुत्रांना समन्स बजाविले आहेत. प्रताप सरनाईक यांना १० डिसेंबरला चौकशीसाठी हजर रहायचे आहे.

...........................

Web Title: Top Security filed a case against the ED's inquirer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.