चक्काजाम आंदोलनाला उपोषणाची धार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:04 AM2018-07-15T06:04:52+5:302018-07-15T06:05:02+5:30

केंद्र व राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या वाहतूकदारांनी चक्काजाम आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यास सुरुवात केली आहे.

The torch of hunger strike for the movement | चक्काजाम आंदोलनाला उपोषणाची धार

चक्काजाम आंदोलनाला उपोषणाची धार

googlenewsNext

मुंबई : केंद्र व राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या वाहतूकदारांनी चक्काजाम आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी २० जुलैला चक्काजाम आंदोलनापासून, आझाद मैदानात बेमुदत साखळी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनदर आणि जीएसटी कमी करण्याच्या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी वाहतूकदारांनी या आंदोलनाची हाक दिली आहे.
राजगुरू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या देशव्यापी आंदोलनात सर्व माल वाहतूकदार ट्रक, ट्रॉली, टेम्पो अशी सर्व प्रकारची मालवाहतूक वाहने आहेत, त्या जागेवर उभी ठेवतील. डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे माल वाहतूकदारांचे दरमहा लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरावर नियंत्रण ठेवायची गरज आहे.
>काही प्रमुख मागण्या
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) या नियामक मंडळाने, माल वाहतूकदारांकडून आकारण्यात येणाºया विम्याच्या रकमेत केलेली ७० टक्क्यांची वाढ तत्काळ रद्द करण्याची मागणी संघटनेने केली.
>चाक, स्पेअर पार्ट चैनीसाठी नाहीत...
केंद्राने माल वाहतूक करणाºया नव्या ट्रकसह वाहनांच्या स्पेअर पार्ट, चाकाच्या खरेदीवर २८ टक्के जीएसटी आकारला आहे.सेवा देणाºया या क्षेत्रावरील जीएसटी १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी आहे. त्यासाठी प्रत्येक राज्याच्या अर्थमंत्र्यांना निवेदन दिल्याचे अशोक राजगुरू म्हणाले.

Web Title: The torch of hunger strike for the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.