Join us

Torres Scam : 1000 कोटींच्या घोटाळा प्रकरणात CEO तौसीफ रियाजला बेड्या, 'या' शहरात बसला होता लपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 16:59 IST

Torres Jewellery Scam: टोरेस ज्वेलरी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला व्यक्तीला अटक केली आहे. 

Torres Jewellery Scam Updates: टोरेस ज्वेलर्सच्या १००० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं. टोरेस ज्वेलर्सची पालक कंपनी असलेल्या Platinum Hern चा सीईओ तौसीफ रियाजला अटक केली. रविवारी (२६ जानेवारी) ही कारवाई करण्यात आली. तौसीफ रियाजला न्यायालयासमोर हजर केले असता, ३ फेब्रुवारी पोलीस कोठडीत सुनावण्यात आली. (CEO Tausif Riyaz arrested) 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोरेस ज्वेलर्सची मुख्य कंपनी Platinum Hern कंपनी आहे. तौसीफ रियाज या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तौसीफ लोणावळ्यात लपून बसला होता. पोलिसांनी रविवारी एका हॉटेलमध्ये त्याला अटक केली. 

तौसीफ रियाजला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

१००० कोटींचा घोटाळा,५ व्यक्तींना अटक

टोरेस ज्वेलर्सचा १००० कोटींचा घोटाळा आहे. पोलिसांनी तौसीफ रियाजसह आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. तौसीफ रियाजविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती. 

या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. एकूण १२ आरोपी असून, त्यापैकी ८ लोक फरार झाले आहेत. यात ७ जण युक्रेनचे आहेत, तर एका भारतीय व्यक्तीचा समावेश आहे. ३० डिसेंबर २०२४ पूर्वीच हे लोक देशातून फरार झाले आहेत. 

ईडीकडूनही तपास सुरू

१००० कोटींच्या घोटाळा प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यू शाखेकडून तपास सुरू आहेत. त्याचबरोबर सक्तवसुली संचालनालयानेही तपास सुरू केला आहे.

हे प्रकरण मनी लॉड्रिंग आणि संशयास्पद व्यवहाराशी संबंधित आहे. ईडीला तसे पुरावेही हाती लागले आहेत. आतापर्यंत ईडीने मुंबई आणि जयपूरसह दहा ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत.  

टॅग्स :मुंबई पोलीसगुन्हेगारीधोकेबाजीअंमलबजावणी संचालनालय