ठाणो : तीन ते चार वर्षापासून स्वत:च्याच मुलीचा लैंगिक छळ करणा:या सूर्यकांत रतांबे या नराधम पित्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. नेहमीच्या त्याच्या या छळाला कंटाळून मुलीने मोठय़ा धाडसाने याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
घोडबंदर रोडवरील विजयनगरी पूजा कॉम्प्लेक्समध्ये राहणारी पीडित मुलगी घरी एकटी असताना तो तिच्याशी चाळे करायचा. दारूच्या आहारी गेलेल्या सूर्यकांतविरोधात 27 सप्टेंबरला रात्री पीडित मुलीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर, तो पसार झाला होता.
मंगळवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध विनयभंग तसेच लैंगिक अत्याचार 376 फ आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या कलमाखाली त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक
दिनकर चंदनकर यांनी दिली. (प्रतिनिधी)