लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By admin | Published: January 2, 2017 06:05 AM2017-01-02T06:05:56+5:302017-01-02T06:05:56+5:30

लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या उमेश साळवी (२५) याने लग्नाला नकार दिल्याने, वैफल्यग्रस्त २६ वर्षीय तरुणीने विषप्राशन करून

Torture by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Next

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या उमेश साळवी (२५) याने लग्नाला नकार दिल्याने, वैफल्यग्रस्त २६ वर्षीय तरुणीने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कळव्यात घडली.
तरुणी एका खासगी कंपनीत मार्केटिंगचे काम करते. २०१३ मध्ये तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर, उमेशने निवृत्तीवेतन मिळवून देण्यासाठी तिला मदत केली. यातूनच त्यांची एकमेकांशी सलगी वाढली. पुढे त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवल्याने, त्यांच्यात ‘जवळीक’ वाढली. याचाच गैरफायदा घेत, त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, पण तिने लग्न करण्याचे नाव काढल्यानंतर मात्र, आता आपण दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असून, आपल्या लग्नाला आईचाही विरोध असल्याचे त्याने तिला सांगितले.
यातूनच वैफल्यग्रस्त झाल्याने, तिने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी पहाटे १.२५ वाजताच्या सुमारास विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Torture by showing lover of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.