Join us

राज्यात एकूण २ कोटी ४६ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात दिवसभरात २ लाख ६७ हजार ४०४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ४६ ...

मुंबई : राज्यात दिवसभरात २ लाख ६७ हजार ४०४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ४६ लाख ८१ हजार ४६५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात मुंबईत आतापर्यंत ३८ लाख ७४ हजार ६१६ लाभार्थ्यांना त्याखालोखाल पुण्यात ३२ लाख १३ हजार ७५३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर ठाण्यात १८ लाख ८५ हजार १७४, नागपूरमध्ये १३ लाख २९ हजार ४३१, नाशिकमध्ये १० लाख ५६ हजार ४९० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १९ लाख ९१ हजार १७९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. १९ लाख ६९ हजार १७८ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण कऱण्यात आले आहे, तर २७ लाख ३६२ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ५० लाख ६८ हजार ७२८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.