राज्यात आतापर्यंत एकूण २ कोटी ९२ लाख लाभार्थ्यांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:42+5:302021-06-25T04:06:42+5:30
मुंबई : राज्यात दिवसभरात ६ लाख १७ हजार ७०६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण २ ...
मुंबई : राज्यात दिवसभरात ६ लाख १७ हजार ७०६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण २ कोटी ९२ लाख ९२ हजार ९०९ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत या वयोगटातील ४२ लाख ६३ हजार ३८२ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २ लाख ४२ हजार ४७० लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात १२ लाख ६१ हजार ३९१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख २३ हजार ४७३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २० लाख ७६ हजार २११ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर ८ लाख ८१ हजार ९९६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६० लाख १९ हजार ९८० लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३७ लाख २४ हजार ६ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.