मुंबई : राज्यात दिवसभरात ३ लाख ८२ हजार ७३१ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण २ कोटी ८० लाख ८२ हजार ९९९ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पूर्ववत सुरू झाल्याने लसीकरणाला गती मिळेल, असा विश्वास आहे. आतापर्यंत या वयोगटातील ३४ लाख १७ हजार ५३६ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २ लाख ३२ हजार ७३१ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात १२ लाख ४८ हजार ६४४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख १५ हजार ६६० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २० लाख ६३ हजार ५१९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर, ८ लाख ६६ हजार ९२४ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ५८ लाख १९ हजार १५३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३६ लाख १८ हजार ८३२ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
जिल्हालाभार्थी
मुंबई ४७३०६२२
पुणे३८०४९६६
ठाणे२२०८१९९
नागपूर१४४१९६१
कोल्हापूर १२७१६५१