Join us

राज्यात आतापर्यंत एकूण ३ कोटी २ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात दिवसभरात ४ लाख ९५ हजार ६२४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ३ ...

मुंबई : राज्यात दिवसभरात ४ लाख ९५ हजार ६२४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ३ कोटी २ लाख ८५ हजार २७ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पूर्ववत सुरू झाल्याने लसीकरणाला गती मिळेल असा विश्वास आहे. आतापर्यंत या वयोगटातील ४९ लाख ५७ हजार ६८५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३८ लाख ४४ हजार ७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ६७ हजार ७७१ आऱोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख २९ हजार ३१४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २० लाख ८४ हजार ३६२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर ८ लाख ९६ हजार ९५० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६१ लाख ४७ हजार ५३८ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३८ लाख ४४ हजार ७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.