राज्यात एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 06:43 AM2019-09-30T06:43:00+5:302019-09-30T06:43:48+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीसाठीराज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार १८८ साह्यकारी मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

A total of 96,661 polling stations in the state | राज्यात एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे

राज्यात एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे

Next

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठीराज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार १८८ साह्यकारी मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या ९६ हजार ६६१ एवढी असणार आहे.
विशेष म्हणजे, पुण्यात २४९ साह्यकारी मतदान केंद्र असणार आहेत, तर त्यानंतर ठाणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये १३३ साह्यकारी मतदान केंद्रे असतील. मुंबई उपनगरमध्ये १०० तर पालघरमध्ये ७३ साह्यकारी मतदान केंद्र असणार आहेत. साधारणपणे १,४०० मतदारांमागे एक मतदान केंद्र असण्याचे प्रमाण आहे. गेल्या काही दिवसांत मतदारांना नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्राचीही वाढ करण्यात आली आहे.

यापूर्वी होते ९५,४७३ मतदान केंद्रांचे नियोजन

विधानसभा निवडणुकांसाठी यापूर्वी ९५ हजार ४७३ मतदान केंद्र स्थापन करण्याचे नियोजन होते. आता मात्र मतदारांची संख्या वाढली असल्याने, नव्याने १ हजार १८८ मतदान केंद्र राज्यभरात वाढविण्यात आली आहेत. मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदार केंद्रांची संवेदनशीलता बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते, असे सांगण्यात आले.

Web Title: A total of 96,661 polling stations in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई