राज्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ९१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:06 AM2021-05-14T04:06:46+5:302021-05-14T04:06:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गुरुवारी ३ लाख १६ हजार ५०६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारी ३ लाख १६ हजार ५०६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ९१ लाख ७३ हजार ३८३ लाभार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख २७ हजार २८१ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात पहिला डोस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ११ लाख ३८ हजार २४२ आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ८९ हजार १३४ आहे. पहिला डोस घेतलेल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या १५ लाख ५१ हजार ६७० आहे. दुसरा डोस घेतलेल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाख ७९ हजार ५२७ आहे. राज्यात सामान्य नागरिकांच्या लसीकरण प्रक्रियेला मागील काही दिवसांपासून वेग येत आहे. यात आतापर्यंत १ कोटी २० लाख ३१ हजार १९ सामान्य लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे, तर २४ लाख ५६ हजार ५१० लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
......................................