मुंबई : राज्यात दिवसभरात ७ लाख ३८ हजार ४५० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत राज्यात एकूण ३ कोटी १० लाख ३३ हजार ३४ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली.
राज्यात १२ लाख ७६ हजार ४ आराेग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख ३४ हजार १९५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. २० लाख ८७ हजार ५५७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ९ लाख १० हजार १९४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६२ लाख ४१ हजार ८०० लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३९ लाख ७४ हजार १०६ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. याचप्रमाणे राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ५४ लाख ४१ हजार ९६६ लाभार्थ्यांनी पहिला, तर २६ लाख ७२ हजार १२ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला.
जिल्हा लाभार्थी
मुंबई ५२,८३,२५१
पुणे ४३,२०,४१६
ठाणे २४,७२,७२९
कोल्हापूर १३,१४,१४०
नागपूर १६,२६,४२०
...............................................................