Join us

नियम मोडणा-या ५५ हॉटेलांना टाळे, ९१३ ठिकाणी बेकायदा बांधकाम तोडले, मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:05 AM

नियमांचे उल्लंघन करून आगीशी खेळ करणा-या उपाहारगृहांवर कारवाई सुरूच असून शुक्रवारी दिवसभरात ३९७ उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली. यापैकी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेल्या आठ उपहारगृहांना टाळे ठोकण्यात आले. आतापर्यंत गेल्या १२ दिवसांमध्ये ९१३ उपाहारगृहे, हॉटेल्स, दुकाने आदी ठिकाणी असलेले बेकायदा बांधकाम तोडण्यात आले. तर ५५ हॉटेल्स, उपाहारगृहांना टाळे ठोकण्यात आले.

मुंबई : नियमांचे उल्लंघन करून आगीशी खेळ करणा-या उपाहारगृहांवर कारवाई सुरूच असून शुक्रवारी दिवसभरात ३९७ उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली. यापैकी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेल्या आठ उपहारगृहांना टाळे ठोकण्यात आले. आतापर्यंत गेल्या १२ दिवसांमध्ये ९१३ उपाहारगृहे, हॉटेल्स, दुकाने आदी ठिकाणी असलेले बेकायदा बांधकाम तोडण्यात आले. तर ५५ हॉटेल्स, उपाहारगृहांना टाळे ठोकण्यात आले.कमला मिल कम्पाउंडमधील मोजोज् बिस्टो आणि वन अबव्ह रेस्टो पबमध्ये लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटताच महापालिकेने ३० डिसेंबरपासून मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंटवर धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाई अंतर्गत नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करणाºया उपाहारगृहाला नोटीस न देता थेट टाळे ठोकण्यात येत आहे. यामध्ये बºयाच मोठ्या हॉटेल्सचा समावेश आहे.गेल्या १२ दिवसांमध्ये मुंबईतील तब्बल दोन हजार ५६८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेली ५५ उपाहारगृहे, रेस्टॉरंट सील करण्यात आली आहेत. ७१८ आस्थापनांना तपासणी अहवाल देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करून घेण्यास बजावण्यात आले आहे. तसेच एक हजार ४१० सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत.अशी सुरू आहे तपासणीसर्व २४ विभागांमध्ये ५२ पथकांद्वारे ही तपासणी सुरू आहे. या प्रत्येक पथकामध्ये मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते आणि इमारत व कारखाने खाते या तिन्ही खात्यांमधील प्रत्येकी एक अधिकारी व आवश्यकतेनुसार संबंधित कर्मचाºयांचा समावेश आहे.यात उपाहारगृहातील अग्निसुरक्षाविषयक बाबी नियमांनुसार असल्याची तपासणी अग्निशमन दलाद्वारे तर आरोग्यविषयक बाबींची तपासणी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिका-यांद्वारे करण्यात येते. तसेच प्रवेशद्वार, मोकळी जागा इत्यादींची तपासणी इमारत व कारखाने या खात्यातील अधिकारी-कर्मचा-यांद्वारे करण्यात येत आहे.या उपाहारगृहांना टाळेजी दक्षिण येथे प्रभादेवी, दादर या ठिकाणी फूड लिंक रेस्टॉरंट नावाची दोन उपाहारगृहे, एच पश्चिम येथे वांद्रे विभागातील लजीज, वॉण्टन, जाफरान व मार्क्स अ‍ॅण्ड स्पेन्सर्स या चार ठिकाणी तर बी वॉर्ड येथे मोहम्मद अली रोड विभागातील आजवा स्वीट व हादीया स्वीट या हॉटेल्स, दुकानांना सील करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई