पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 06:32 PM2021-03-20T18:32:57+5:302021-03-20T18:49:04+5:30

Tourism Minister Aaditya Thackeray test positive for covid-19: संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहन

Tourism Minister Aaditya Thackeray test positive for covid 19 | पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

Next

मुंबई: पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली. त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. कायम मास्क घालण्याचं आणि स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे. (Tourism Minister Aaditya Thackeray test positive for covid-19)

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असं आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 



गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गेल्या ६ दिवसांत मुंबईत १३ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात शहरात ३ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. फेब्रुवारीच्या मध्यपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. गेल्या संपूर्ण वर्षात कधीही शहरात दिवसभरात ३ हजार रुग्ण आढळून आले नव्हते. मात्र शुक्रवारी मुंबईत ३ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. 

Read in English

Web Title: Tourism Minister Aaditya Thackeray test positive for covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.