मुंबई: पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली. त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. कायम मास्क घालण्याचं आणि स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे. (Tourism Minister Aaditya Thackeray test positive for covid-19)माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असं आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 6:32 PM