मुंबईतील नद्यांचे पुनरुज्जीवन करणार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 06:33 IST2020-03-06T00:07:01+5:302020-03-06T06:33:06+5:30
ओशिवरा, दहिसर, पोयसर या नदी परिसरातील गोठे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतील नद्यांचे पुनरुज्जीवन करणार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
मुंबई : पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने मुंबईतील मिठी, ओशिवरा, दहिसर, पोयसर या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचे काम वेगात सुरू आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही नद्यांनी मोकळा श्वास घेणे आवश्यक असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी विधान परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील नद्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावर मिठी नदीचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल. शिवाय, ओशिवरा, दहिसर, पोयसर या नदी परिसरातील गोठे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
होर्डिंग धोरण लागू करणार
होर्डिंगसाठी नव्हे तर कोणत्याही कारणासाठी झाडे तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. वरळी मतदारसंघातच होर्डिंगला अडथळा येत असल्याने झाडेच तोडण्यात आली. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लक्ष वेधल्यावर कोणत्याही कारणाने झाडांची अवैध कत्तल केल्यास कडक कारवाई केली जाईल. शिवाय, मुंबईच नव्हे तर राज्यासाठीच होर्डिंग पॉलिसी आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.