Join us

थंडीतही थंड हवेच्या ठिकाणांचीच पर्यटकांना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 7:03 AM

थंडीची चाहूल लागताच मुंबईकरांसह अनेकांची पावले आपोआपच घराबाहेर पडतात. दिवाळी संपताच येणारा नाताळ आणि नवीन वर्ष ही यासाठी पर्वणीच ठरते.

- सागर नेवरेकरमुंबई : थंडीची चाहूल लागताच मुंबईकरांसह अनेकांची पावले आपोआपच घराबाहेर पडतात. दिवाळी संपताच येणारा नाताळ आणि नवीन वर्ष ही यासाठी पर्वणीच ठरते. विशेष म्हणजे या वर्षीदेखील अनेक पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जाण्यास पसंती देत आहेत. कारण थंडीच्या मोसमात थंड हवेच्या ठिकाणी हॉटेल्सचे दर काही प्रमाणात कमी असतात, साहजिकच देशभरातून थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या वर्षी ती १३३ टक्क्यांनी वाढलेली दिसून येत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा थंड ठिकाणी एकट्या-दुकट्या जाणाºयांच्या (सोलो ट्रॅव्हलरच्या) संख्येत तब्बल १३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये शिमला या थंड हवेच्या ठिकाणाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. या वर्षी एकूण बुकिंगमध्ये १०४ टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर शिलाँग, गंगटोक, मसुरी, उटी, डलहौसी यांकडे पर्यटकांचा ओढा असल्याचे एका सर्व्हेमधून समोर आले.गोवा, पुरी, पाँडिचेरी, पोर्ट ब्लेअर, अलप्पुझा, दिघा अशा बिचवर जाण्याचे नियोजनही पर्यटक करीत आहेत. या ठिकाणांसाठी करण्यात आलेल्या बुकिंगमध्ये २०१७ मधील हिवाळी सुट्यांच्या तुलनेत ६६ टक्के वाढ झाली आहे. बिच आणि थंड हवेच्या ठिकाणांची तुलना करता कुटुंब, जोडप्याने जाणाºयांचा कल थंड हवेच्या ठिकाणांकडे असल्याचे दिसून येत आहे. थंड हवेच्या ठिकाणी जाणाºया जोडप्यांचे प्रमाण ९९ टक्के व ट्रॅव्हलर्सचे प्रमाण १०६ टक्क्यांनी वाढले आहे. तर बिचवर जाणाºया जोडप्यांचे व कुटुंबांचे प्रमाण अनुक्रमे ७१ टक्के व ६३ टक्क्यांनी वाढले आहे.२०१८ मध्ये हिवाळ्यात झालेल्या बुकिंगमध्ये उत्तर भारतामध्ये दिल्ली, जयपूर, शिमला, उदयपूर ही आघाडीची शहरे आहेत. तर दक्षिण भारतात हैदराबाद, बंगळुरू, पाँडिचेरी, कोची, मैसुर, उटी यांना पर्यटकांनी पसंती दिल्याचे सर्वेक्षणातील विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.प्रवासाचे नियोजन करणे सोपेसहलीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सोलो, कपल्स आणि कुटुंब व मित्रमंडळी अशा सर्व प्रकारच्या ट्रॅव्हलरना फोनवरूनही प्रवासाचे नियोजन करणे सहज शक्य होत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सुट्टीच्या काळात लक्षणीय बुकिंग करणाºयांमध्ये सोलो ट्रॅव्हलर्सचा वाटा मोठा आहे. हा ट्रेंड दर वर्षागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.- बुºहनुद्दिन पिठावाला, उपाध्यक्ष, ओयो हॉटेल्स अ‍ॅण्ड होम्सचे कॉन्व्हर्सेशन्सवाढती टक्केवारी : गेल्या वर्षीच्या तुलनेत सोलो ट्रॅव्हलरच्या संख्येत तब्बल १३३ टक्के वाढ; बिचच्या ठिकाणी जाण्यासाठी ६६ टक्क्यांहून अधिक बुकिंग; थंड हवेच्या ठिकाणांसाठीच्या बुकिंगमध्ये १०४ टक्के वाढ; बिचवर जाणाºया कपल ट्रॅव्हलरच्या बुकिंगमध्ये ७१ टक्के वाढ.

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशन