Join us  

‘देवकुंड’ परिसरात पर्यटकांनो सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:17 AM

वर्षा सहलीसाठी ट्रेकर्ससह पर्यटांचे आवडतीचे ठिकाण असलेल्या देवकुंड धबधबा परिसरात सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : वर्षा सहलीसाठी ट्रेकर्ससह पर्यटांचे आवडतीचे ठिकाण असलेल्या देवकुंड धबधबा परिसरात सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात जरा सावध राहण्याचे आवाहन माणगाव तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.माणगाव तालुक्यातील मौजे भिरा गावच्या हद्दीतील देवकुंड धबधबा येथे पावसाळ्यात वर्षा सहलीसाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पण पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षेसह या परिसरात घडणाºया दुर्घटनांना आळा बसावा यासाठी धरण, तलाव आणि धबधब्यांच्या एक कि.मी. परिसरात ९ आॅक्टोबरपर्यंत माणगाव उपविभागीय दंडाधिकारी बाळासाहेब तिडके यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पण हे आदेश अत्यावश्यक सेवांना लागू राहणार नाही.यावर असणार बंदीया आदेशानुसार देवकुंड नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे तसेच वाहतुकीवर परिणाम करणाºया ठिकाणी फोटोग्राफी करणे, धोकादायक पाण्यात, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्याच्या वरील बाजूला जाणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा व इतर वस्तू फेकणे, महिलांची छेडछाड करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, धरण, तलाव, धबधब्याच्या एक कि.मी. परिसरात दुचाकी, चारचाकी,सहाचाकी वाहनांचे प्रवेशाला प्रतिबंध करण्यात आला आहे.