वर्षाविहारासाठी तीनवीरा धरणाला पर्यटकांची पसंती

By admin | Published: June 27, 2015 10:46 PM2015-06-27T22:46:59+5:302015-06-27T22:46:59+5:30

पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना ओढ लागते ती धबधब्यावरील पावसाळी सहलींची. वीकएण्ड अथवा एकदिवसीय सहलींसाठी अलिबाग मुंबई, ठाण्याकडील

Tourists' choice for rainy season | वर्षाविहारासाठी तीनवीरा धरणाला पर्यटकांची पसंती

वर्षाविहारासाठी तीनवीरा धरणाला पर्यटकांची पसंती

Next

कार्लेखिंड : पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना ओढ लागते ती धबधब्यावरील पावसाळी सहलींची. वीकएण्ड अथवा एकदिवसीय सहलींसाठी अलिबाग मुंबई, ठाण्याकडील पर्यटकांसाठी उत्तम पर्याय आहे. अलिबाग-मुरूड तालुक्याला लाभलेला समुद्र किनाऱ्याबरोबरच हिरव्यागार डोंगरांतून कोसळणारे धबधबे सध्या पर्यटकांना मोहिनी घालत आहेत. पेण अलिबाग मार्गावर निसर्गाच्या कुशीत बांधलेले तीनवीरा धरणावरही सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या हे धरण दुथडी भरून वाहत आहे.
धरणावर बांधलेला बंधारा जमिनीपासून पन्नास ते पंचावन फूट आहे. त्यामुळे धरणातील पाणी या बंधाऱ्यावरून खाली पडताना एवढा सुंदर दिसतो की, पाहणाऱ्या माणसाला त्या कोसळणाऱ्या पाण्यात जाण्याचा मोह आवरत नाही. या धबधब्याखाली भिजताना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नसल्याने मनमुराद आनंद लुटता येतो. त्यामुळे आठवड्याच्या शनिवारपासूनच पर्यटकांची वर्षाविहारासाठी सुरुवात झाली आहे.

Web Title: Tourists' choice for rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.