Join us  

१० वर्षांत पर्यटक दुप्पट वाढतील, एक लाख कोटींची गुंतवणूक : गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 7:31 AM

राज्याच्या पर्यटनाचा चेहरामोहरा बदलणार, अर्थव्यवस्थेला बळकटी देणार: पर्यटन व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटनाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेले नवे पर्यटन धोरण महायुती सरकारने आणले असून, त्याद्वारे येत्या दहा वर्षांत राज्यातील पर्यटकांची संख्या दुप्पट होईल आणि एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात होईल, असा विश्वास राज्याचे पर्यटन व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. महाजन यांनी नवीन पर्यटन धोरणाबाबत 'लोकमत'शी विशेष बातचित केली.

महाजन: पर्यटनाच्या क्षेत्रात उतरू इच्छिणाऱ्या लहानमोठ्या व्यक्त्ती/व्यावसायिक / कंपन्या यांना भरभरून आर्थिक प्रोत्साहन देण्याची तरतूद या धोरणात आहे. मला वाटते की फायनान्शियल इन्सेंटिव्ह' म्हणजे आर्थिक प्रोत्साहन हाच या धोरणाचा गाभा आहे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी इतर राज्यांऐवजी महाराष्ट्रातच यावे यासाठी जाणीवपूर्वक तशी भूमिका घेण्यात आली आहे.

• या धोरणाचा वेगळा पैलू आहे का? राज्याच्या पर्यटन विकासासाठी हे धोरण कसे पोषक ठरेल?महाजन : राज्यात आज वर्षांकाठी १५ कोटी पर्यटक येतात. येत्या १० वर्षात ही संख्या ३० कोटींवर जावी हा उद्देश आहे. १८ लाख लोकांना रोजगार मिळेल, याआधी १९९१, २०१६ मध्येही पर्यटन धोरण सरकारने आणले होते. यावेळचे धोरण हे पर्यटनातून अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर देणारे आहे. केरळ, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड अशा पर्यटनप्रधान राज्यांच्या धोरणांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक धोरणातील चांगले मुद्दे है धोरणात समाविष्ट केले आहेत.महाजन : कॉर्पोरेट जगताला आकर्षित करण्यासाठी आम्ही एमआयसीई ही एक संकल्पना आणली आहे. एम म्हणजे मिटिंग्ज, आय म्हणजे इन्सेंटिव्हज, ई म्हणजे एक्झिबिशन आणि सी म्हणजे कॉन्फरन्स. कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या परिषदा, चर्चासत्रे, डीलर्सचे

• पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल असे आपल्याला वाटते का?महाजन : निश्चितच वाढेल. आम्ही केवळ मोठ्या गुंतवणूकदारांनाच सवलती देणार असे नाही. अगदी एखाद्या पर्यटनस्थळी 'बेड अँड ब्रेकफास्ट' म्हणजे बीएनबीची व्यवस्था पर्यटनस्थळी करणाऱ्या घरमालकांनाही आम्ही सवलती देणार आहोत. पर्यटन वाडायचे तर पर्यटन स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था विविध उत्पन्न गटांतील लोकांसाठी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पंचतारांकितपासून विविध हॉटेल्स उभे राहायला हवेत. पर्यटन उद्योगाला लागणारे कुशल बळ विकसित करण्याचरही भर दिला आहे.गेट टू गेदर आदींसाठी पर्यटनस्थळी जाण्याला प्राधान्य देतात. अशा आयोजनांसाठी विशेष सवलती या धोरणात देण्यात आल्या आहेत.

• कोणत्या प्रकारच्या सवलती या धोरणामध्ये दिल्या आहेत ?महाजन : लहानमोठ्या सर्वच गुंतवणूकदारांना सवलती, सीजीएसटीचा परतावा, वीज दरात सवलत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना वित्तीय प्रोत्साहन, व्याज व अनुदान, महिला उद्योजक, अनुसूचित जाती-जमाती आणि भिन्न घटकांना अतिरिक्त प्रोत्साहन, पर्यटकांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या टूर्स अँड ट्रॅव्हल एजंटना आर्थिक प्रोत्साहन, गुंतवणूकदारांना मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्कात सूट, आदरातिथ्य उद्योगातील संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाईल. कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटनासाठीही आर्थिक प्रोत्साहनाची तरतूद आहे.

टॅग्स :गिरीश महाजन