Join us  

आयआयटीत स्पर्धांची रेलचेल

By admin | Published: December 28, 2015 3:11 AM

विज्ञान तंत्रज्ञानाला उजाळा देणाऱ्या आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’ महोत्सवाची धमाल सध्या कॅम्पसमध्ये सुरू आहे. विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांनी या महोत्सवाचा दुसरा दिवसही तितक्याच जोशात पार पडला

मुंबई : विज्ञान तंत्रज्ञानाला उजाळा देणाऱ्या आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’ महोत्सवाची धमाल सध्या कॅम्पसमध्ये सुरू आहे. विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांनी या महोत्सवाचा दुसरा दिवसही तितक्याच जोशात पार पडला. अनेक स्पर्धांनी उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली. शनिवारी सुरू झालेल्या आयआयटी फेस्टला जगभरातून अनेकांनी उपस्थिती लावली असून, यात असलेले रोबोज् महोत्सवाचे आकर्षण आहे. रविवारी कॅम्पसमध्ये अनेक स्पर्धा रंगल्या. यात ‘रोबो वॉर’, ‘इंटरनॅशनल रोबोटिक चॅलेंज’, ‘डायमेन्शन’, ‘रोबोट्रॉन’, ‘सोल’ या स्पर्धांचा समावेश होता. या ठिकाणी घेण्यात आलेली ‘सोल’ ही स्पर्धा या दिवसाचे आकर्षण ठरली. यात कमीतकमी खर्चात सौरदिवे स्पर्धकांना बनवायचे होते. यातील विजेत्या स्पर्धकांचे दिवे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘मिलीयन सोल’ या प्रकल्पांतर्गत केले जाणार आहे. भविष्यातील विजेची बचत करण्यासाठी आयआयटीकडून उचलण्यात आलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल. शिवाय या वेळी सहावेळा गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलेला अ‍ॅलेक्सीस आटर््स हा लाईट इल्यूजनचा कार्यक्रमही उपस्थितांना खिळवून ठेवणारा होता. केनेथ सबेस्टियन या परदेशी तरुणाने मार्शल आर्ट, माईम आणि विनोदी किस्से सांगून उपस्थितांना खूश केले.नवनिर्माणाच्या वृत्तीतूनच शोधाची निर्मिती - जयंत नारळीकरमुंबई : नवनिर्माण करण्याच्या वृत्तीमधूनच शोधाची निर्मिती होत असते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. ‘भौतीकशास्त्र आणि विश्वउत्पत्तीशास्त्र’ या विषयावर टेकफेस्टमध्ये आयोजित व्याख्यानात नारळीकर बोलत होते. मानवी जीवनाला उपयुक्त ठरणाऱ्या नवनवीन संशोधनावर तरूणांनी भर द्यावा, असे प्रतिपादनही त्यांनी केले. विश्वाची निर्मिती आणि वय मापन सिद्धांत या विषयाचे त्यांनी सविस्तर विश्लेषन केले. देशातील काळ्या पैशाचा सिद्धांत हा विश्चाच्या ‘दि आमाउंन्ट आॅफ डार्क मॅटर, मे एक्सीड अमाउंन्ट आॅफ व्हिजीबल मॅटर’ या सिद्धांतावर अवलंबून असल्याचे वक्तव्य करत त्यांनी प्रशासनाची टर खेचली.