Join us  

छ. संभाजीनगरमध्ये टोयोटाचा २५ हजार कोटींचा प्रकल्प; ८ हजार प्रत्यक्ष रोजगार!

By यदू जोशी | Published: July 31, 2024 6:14 AM

देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये जपान दौऱ्यावर असताना या प्रकल्पाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबईत बुधवारी परस्पर सामंजस्य करार (एमओयू) होणार आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये जपान दौऱ्यावर असताना या प्रकल्पाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. कंपनीसमोर गुजरात, तमिळनाडू आणि महाराष्ट्र असे तीन पर्याय होते. त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. या प्रकल्पात ८ हजार जणांना प्रत्यक्ष तर १६ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. 

यांच्यात हाेणार करार

बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार होणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझू योशिमुरा आणि उपाध्यक्ष मानसी टाटा प्रामुख्याने उपस्थित असतील.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या गतिमान विकासासाठी आमच्या सरकारने पुढाकार घेतला आहे. जपानमधील वित्तीय संस्था आणि नामवंत कंपन्यांनी महाराष्ट्राप्रति नेहमीच सहकार्याची भावना बाळगली आहे. त्याचाच परिपाक म्हणून टोयोटाची मोठी गुंतवणूक आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री. 

टॅग्स :टोयोटादेवेंद्र फडणवीसराज्य सरकार