मागोवा २०२० आरटीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:07 AM2020-12-31T04:07:00+5:302020-12-31T04:07:00+5:30

भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी बंद १ एप्रिलपासून भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणाऱ्या ...

Track 2020 RTO | मागोवा २०२० आरटीओ

मागोवा २०२० आरटीओ

Next

भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी बंद

१ एप्रिलपासून भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी करू नये, असे आदेश परिवहन विभागाने बंद केली आहे. देशात वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रदूषित शहरांची संख्येत भर पडली आहे. हवेतील कार्बन मोनाक्‍साइड, नायट्रोजन ऑक्‍साइडचे प्रमाण वाढल्याने श्‍वसनाचे विकारात भर पडत आहे. केंद्र सरकारने आता बीएस-४ वाहनांची नोंदणी बंद करण्याचा निर्णय घेतला. आता बीएस-६वाहनांचे उत्पादन घेणे कंपन्यांना बंधनकारक केले आहे.

आरटीओच्या ७० सेवा ऑनलाइन

राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांमध्ये एकूण ११० सेवा दिल्या जातात. यामधील ७०सेवा ऑनलाइन आहेत, तर १० सेवा प्रायोगिक तत्त्वावर काही आरटीओ कार्यालयात सुरू आहेत. त्या यशस्वी झाल्या की राज्यात लागू होणार आहेत. यामध्ये कागदपत्रे ऑनलाइन सबमिट करू शकता, फी किंवा कर ऑनलाइन भरू शकता, परंतु त्या अर्जाची प्रिंट काढून सही करून मूळ कागदपत्र कार्यालयात स्वतः जाऊन द्यावे लागतात. त्यावर सही करण्यासाठी उपस्थित राहावे लागते. इसाईनद्वारा हे कागदपत्रेही ऑनलाइन सबमिट करता येणार आहेत.

राज्यात १,३२४ अपघात प्रवण क्षेत्र

राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अपघात होत आहेत. या अपघातांना लगाम लावण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्रे शोधण्यात आली असून, राज्यात एकूण १,३२४ अपघात प्रवण क्षेत्रे आहेत. अपघात टाळण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्रांवर उपाययोजना सुरू आहेत. ५०० मीटर क्षेत्रामध्ये मागील सलग तीन वर्षांत एकूण पाच प्राणांतिक अपघात किंवा गंभीर अपघात अथवा एक किंवा एकापेक्षा जास्त अपघात झाले असतील, त्या ‘अपघात प्रवण क्षेत्र’ म्हटले जाते.

राज्यातील १०० टक्के पीयूसी सेंटर ऑनलाइन

केंद्र सरकारने वाहनांची पीयूसी (वायुप्रदूषण तपासणी) ऑनलाइन करण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार, राज्यात आरटीओ त्याची अंमलबजावणी करत आहे. राज्यातील ५० आरटीओ लमध्ये एकूण २,२०० पीयूसी सेंटर आहेत. यातील १०० टक्के पीयूसी सेंटर ऑनलाइन झाले आहेत. एखाद्या वाहनाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेतल्यानंतरच वाहन रस्त्यावर आणता येते, अन्यथा १० हजार रुपये दंड व सहा महिन्यांपर्यंत शिक्षा भोगावी लागते.

वायुवेग पथकाला इंटरसेप्टर वाहनांची प्रतीक्षा

परिवहन विभागाने (आरटीओ) वायुवेग पथकासाठी ३८ इंटरसेप्टर वाहनांचा प्रस्ताव वित्त विभागाला मंजुरी साठी सादर केला होता. मात्र, हा या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे वायुवेग पथकाला इंटरसेप्टर वाहनांसाठी वाट पाहावी लागणार आहे. इंटरसेप्टर वाहनांमध्ये रडार स्पीड गन, ब्रेथ अनलायझर, टिंट मीटर, फायर इक्सटिगशर, फर्स्ट रिस्पॉन्ड किट या बाबींचा समावेश असतो.

Web Title: Track 2020 RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.