मागोवा - गुन्हे २०२०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:06 AM2020-12-31T04:06:36+5:302020-12-31T04:06:36+5:30

अभिनेता सुशांतच्या मृत्यूने खळबळ १. अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर हत्या की आत्महत्या याने ...

Track - Crime 2020 | मागोवा - गुन्हे २०२०

मागोवा - गुन्हे २०२०

Next

अभिनेता सुशांतच्या मृत्यूने खळबळ

१. अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर हत्या की आत्महत्या याने सोशल मीडियासह राजकीय वातावरण तापले. मृत्यूप्रकरणात बिहार पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलीस आमने सामने आले. तर्कवितर्काच्या राजकीय खेळीत हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले गेले. यातच राज्य सरकार, मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ट्विटरवर दीड लाखांहून अधिक खाती सापडली आहेत.

....

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन

२. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन शोधण्यासाठी सुरू झालेला तपास बॉलीवूड सिनेतारकांपर्यंत पोहोचला. यात, अनेक दिग्गज कलाकार, अभिनेत्रींना एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

......

वाहिन्यांचा ‘टीआरपी’ घोटाळा

३. अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’ वाढवणाऱ्या वाहिन्यांचा ऑक्टोबरमध्ये गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. बीएआरसीला मदत करणाऱ्या हंसा रिसर्च सेंटरचा माजी कर्मचारी विशाल भंडारीपासून सुरू झालेले अटकसत्र बीएआरसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्तापर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात रिपब्लिक टीव्हीसह अनेकांचा टीआरपी उघड झाला आहे.

.....

ईडीचा फास...

४. टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारात शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यापाठोपाठ पीएमसी बँक घोटाळा संबंधित व्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्याविरुद्ध ईडीचा ससेमिरा सुरू झाला. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेदेखील ईडीच्या रडारवर असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

.....

डी.सी. अवंती कार घोटाळा

५. भारतीय बनावटीची पहिली स्पोर्ट्स कार अशी ओळख असलेला ‘डीसी अवंती’ कार घोटाळ्याचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. उत्पादक कंपनी असलेल्या ‘दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड’या कंपनीने ग्राहकांऐवजी स्वत:च कार विकत घेतल्या. त्यासाठी खासगी वित्त संस्थांकडे एकच कार तारण ठेवून कर्ज घेतले. विशेष म्हणजे एकाच इंजिन-चासी क्रमांकाच्या दोन किंवा त्याहून अधिक कारची नोंद विविध राज्यांत करून त्या विक्रीस काढल्या. याप्रकरणी दिलीप छाब्रियाला बेड्या ठोकल्या आहेत.

...

Web Title: Track - Crime 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.