ट्रॅकवर पाणी, तरीही ट्रेन बेदरकार, ट्रेन नेणा-या मोटरमनची आता चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:33 AM2017-09-22T05:33:00+5:302017-09-22T05:33:03+5:30

मंगळवारी संततधार पावसामुळे नालासोपारा स्थानकात पाणी भरलेले असतानाही भरधाव वेगाने ट्रेन नेणा-या मोटरमनची आता चौकशी होणार आहे.

The track, water, train locomotive, train-carrying motor, will now be investigated | ट्रॅकवर पाणी, तरीही ट्रेन बेदरकार, ट्रेन नेणा-या मोटरमनची आता चौकशी होणार

ट्रॅकवर पाणी, तरीही ट्रेन बेदरकार, ट्रेन नेणा-या मोटरमनची आता चौकशी होणार

Next

महेश चेमटे

मुंबई : मंगळवारी संततधार पावसामुळे नालासोपारा स्थानकात पाणी भरलेले असतानाही भरधाव वेगाने ट्रेन नेणा-या मोटरमनची आता चौकशी होणार आहे. यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी दिले आहेत. या समितीत सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि ट्रॅक सेफ्टी अधिकाºयांचा समावेश असेल.
रेल्वे रुळावर पाणी साचलेले असताना पाण्याचे फवारे उडवत भरधाव वेगाने जाणाºया या एक्स्प्रेसचा व्हिडीओ सोशल मीडियामुळे व्हायरल झाला. माध्यमांमधील वृत्तानंतर सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ करणाºया पश्चिम रेल्वेने तातडीने चौकशी समिती नेमली. ‘ती’ एक्स्प्रेस ‘जयपूर-पुणे एक्सप्रेस’ होती. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गाचे जबाब नोंदवले जाणार आहेत. त्यानंतर समिती अहवाल सादर करणार असल्याच्या वृत्ताला पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दुजोरा दिला.
>माहिती नसणे हे आश्चर्यकारकच!
मुळात मुंबईच्या विविध रेल्वे स्थानकांवरील अनेक प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघड होतात. व्हायरल व्हिडीओच्या १२ तासांनंतरही पश्चिम रेल्वे प्रशासनाला स्थानक कोणते? आणि एक्स्प्रेस कोणती? हे कळू शकले नव्हते, हे आश्चर्यकारक आहे. पश्चिम, मध्य रेल्वेत कुठेही ‘खट्ट’ झाले तरी ती माहिती जनसंपर्क विभागाकडे पाठविली जाते. मात्र हे घडूनही माहिती नसेल तर रेल्वेसाठी हा अभ्यासाचा विषय आहे.
- समीर झवेरी, रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता

Web Title: The track, water, train locomotive, train-carrying motor, will now be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.