Join us

मागोवा: एसटी, बस आणि रेल्वेसेवा ठरली प्रवाशांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:07 AM

लाइफलाइन ठरली रेल्वेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक बंद आहे, परंतु विशेष लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्या चालविण्यात येत आहेत. ...

लाइफलाइन ठरली रेल्वे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक बंद आहे, परंतु विशेष लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्या चालविण्यात येत आहेत. मात्र, सध्या केवळ आरक्षणावरच प्रवास करण्याची सुविधा असलेल्या विशेष गाड्या धावत आहेत. सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या पॅसेंजर गाड्या बंद आहेत, तसेच लोकलमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारांना प्रवेश देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी यासह वकील, सुरक्षारक्षक आणि यांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या सुरू

पार्सल ट्रेनमधून अत्यावश्यक साखळीला मदत

परळ कार्यशाळेने बनविले पाचवे झेडडीएम ३ नॅरो गेज इंजिन

मध्य रेल्वेच्या व्यवसाय विकास युनिटमुळे मालवाहतुकीत वाढ

कोरोनाशी लढा देण्यासाठी मध्य रेल्वे वापरतेय रोबोट आणि रोबोटिक उपकरणे, प्रवासी तपासणी

सुरक्षित तिकीट वितरण आणि तपासणी

प्रवासी आणि सामानाशी शून्य संपर्क

पश्चिम रेल्वेचे ईपेट्रोलिंग आणि मॅनेजमेंट ॲप

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढाकार

मध्य आणि पश्चिम रेल्वेची विविध पूल, गर्डर, ओव्हर ब्रीजची कामे

कोरोना काळात एसटीची दमदार कामगिरी

कोरोना महामारीच्या संकटामध्ये महाराष्ट्राची ''लोकवाहिनी'' असलेल्या एसटीने विविध ठिकाणी प्रवासी दळण-वळणाची सेवा देऊन शासनाच्या आरोग्य, पोलीस, महसूल, परिवहन या विभागांच्या खांद्याला खांदा लावून दमदार कामगिरी केली आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी इ. लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली आहे. एसटीनेही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, तसेच महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एसटी बसकडे पाहिले जाते, त्या एसटी बसेस स्थलांतरित मजूर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. ९ मेपासून ३१ मेपर्यंत ४४ हजार १०६ बसेसद्वारे सुमारे ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बृहनमुंबई महानगरपालिकेला कोविड १९ रुग्णांची वाहतूक करण्यासाठी १२ एसटी बसेसचे रूपांतर रुग्णवाहिकेत करून दिले आहेत. या रुग्णवाहिका सध्या महापालिकेच्या सेवेत आहेत.

एसटी महामंडळाच्या नावीन्यपूर्ण योजना

१ पेट्रोल-डिझेल पंप सुरू करणे

२ एसटीची मालवाहतूक*

३ टायर रिमोल्डिंग (पुन:स्थिरीकरण)

४ एसटी महामंडळाच्या कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन

५ नाथजल (शुद्ध पेयजल योजना)

६ प्रवासी माहिती प्रणाली

७ मराठा आरक्षण आंदोलनात मृत पावलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी

८ कोरोना मृत्युप्रकरणी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान

बेस्टमुळे प्रवाशांना दिलासा

रेल्वेतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे, त्यामुळे खासगी क्षेत्रांत काम करणारे बहुतांश कर्मचारी सध्या बेस्ट बससेवेवर विसंबून आहेत. बेस्टच्या बसमधूनच ते कामावर येजा करत आहेत. आता बेस्टच्या बसेसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक होणार असल्याने या कर्मचाऱ्यांची प्रवासकोंडी मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत झाली.

रिक्षा-टॅक्सी चालकांचे फटका

यंदाचे वर्ष रिक्षा टॅक्सीसाठी फारसे आशादायक राहिले नाही. राज्य सरकारने ''मिशन स्टार्ट अगेन'' सुरू केल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी नोंदणीकृत ऑटोरिक्षांपैकी केवळ ३० टक्के रिक्षा रस्त्यांवर आहेत. टॅक्सीची संख्याही कमी आहे. ॲप आधारित कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह कमी केले, त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांचे नुकसान झाले. काही चालकांनी कर्ज काढून वाहने घेतली होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये उत्पन्न नसल्याने अनेकांच्या गाड्या बँक किंवा खासगी फायनान्स संस्थेने नेल्या आहेत.