१४ गुह्यांतील जप्त केलेला मुद्देमाल नागरिकांना केला परत
१४ गुन्ह्यांतील जप्त केलेला मुद्देमाल नागरिकांना केला परत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हत्या, चोरी, जबरी चोरी, घरफोडी तसेच बोलण्यात गुंतवून लंपास केलेले १४ गुन्ह्यांतील एक कोटी ९२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ऐवज मंगळवाऱी तक्रारदारांना परत देण्यात आले. अखेर हक्काचे दागिने परत मिळाल्यामुळे तक्रारदारांंनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
भायखळा पूर्वकडील मध्य प्रादेशिक विभाग कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मध्य प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते हे दागिने तक्रारदारांना परत देण्यात आले. \Iभायखळा पोलीस ठाण्यातील बोलबच्चन करून व्यापाऱ्याचे सव्वा कोटी किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. \Iव्यापाऱ्याला आपले दागिने परत मिळाल्यामुळे तो भारावून गेला होता. त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले; तर दुसरीकडे वरळीतील हत्या, लुटीच्या गुन्ह्यातील २४ लाख ४६ हजार किमतीचे दागिने चोरी, तसेच सायन, दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण एक कोटी ९२ लाख ८० हजार ९६२ रुपये किमतीच्या जप्त करण्यात आलेल्या ऐवजाचे यावेळी वाटप करण्यात आले.
यावेळी हेमंत नगराळे यांनी नागरिकांसाठी मुंबई पोलीस नेहमी प्रयत्न करणाऱ असल्याचे सांगितले. तसेच घरातील एखादी वस्तू हरवल्यानंतर माणूस बेचैन, अस्वस्थ होतो. ती वस्तू अचानक सापडल्यानंतरचा आनंद काही वेगळाच असतो; त्याचप्रमाणे गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळताना आनंद तक्रारदारांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. मुंबई पोलीस या दृष्टीने अधिक प्रयत्न करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास हेमंत नगराळे यांनी यावेळी व्यक्त केला.
तर दुसरीकडे, ज्ञानेश्वर चव्हाण यांनी, नागरिकांना दक्ष राहून, आपल्या परिसरातील साध्या गणवेशातील पोलिसांचे काम करावे. कुठेही संशयास्पद वस्तू, माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधावा. जेणेकरून गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यास मदत होईल, असे सांगितले.