Join us

पारंपरिक केडियांना मिळाला नवा साज!

By admin | Published: October 08, 2015 5:14 AM

नवरात्रीच्या काळात रासगरबा, दांडिया खेळताना तरुण-तरुणी हटके लूक जपताना दिसतात. त्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी सुरु झाली असून पारंपरिकतेच्या बरोबरीने डिझायनर्स

- लीनल गावडे , मुंबईनवरात्रीच्या काळात रासगरबा, दांडिया खेळताना तरुण-तरुणी हटके लूक जपताना दिसतात. त्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी सुरु झाली असून पारंपरिकतेच्या बरोबरीने डिझायनर्स आणि वैशिष्ट्यपूर्ण पोशाखांना मागणी दिसून येत आहे. त्यात गुजराती पद्धतीचे पारंपरिक घागराचोळी आणि केडीयाची मागणी अधिक आहेसध्या मुलुंड, घाटकोपर, दादर, बोरीवली, भुलेश्वर याठिकाणी गरब्याच्या पोशाखांनी बाजार भरुन गेला आहे. इतकेच नाही तर आता लहान लहान विक्रेत्यांनीसुद्घा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घागराचोळी आणि केडीया विक्रीसाठी ठेवले आहेत. डिझायनर्स कपड्यांचे वेड लक्षात घेता पारंपरिक कपड्यांना पाश्चिमात्य टच दिलेला दिसत आहे.लाल, हिरवा, पोपटी या फिकट रंगांसोबत काळ््या रंगाच्या घागराचोळींवर पॅचवर्क,जरदोसी वर्क , कच्छी वर्क केलेल्या दिसत आहे. त्यातही भरगच्च चोळी आणि त्यामानाने हलके घागरे घेण्याकडे अनेक तरुणींचा कल आहे. काजकाम आणि कच्छी भरतकाम केलेले घागरे अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. यावर पोपट, मोर लावलेले घागरे आकर्षून घेणारे आहेत. याशिवाय साध्या चोळी,लाँग स्कर्टला वेगळा लूक देण्यासाठी अनेक प्रकाराच्या भरजरी लेससुद्धा १०० रुपये मीटर या दरात बाजारात आहेत. शिवाय महिलांसाठी लेडी केडीया धोती सुद्धा आहेत. हा प्रकार पुरुषांच्या केडीया प्रमाणेच असतो.परंतु यात वेगवेगळ्या रंगसंगीचा उपयोग केलेला दिसत आहे. हे केडीया ८०० रुपयांपासून असून अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत.घागराचोळी घालणे शक्य नसेल तर गरब्यासाठी कच्छी वर्क केलेली जॅकेटस तुम्ही वापरु शकता कारण घागराचोळी पाठोपाठ अशा प्रकारची जॅकेटस खरेदी करताना अनेक तरुणी दिसत आहेत. पुढच्या बाजूला कच्छी वर्क आणि पाठीवर जरदोसी वर्क केलेली जॅकेटस गुलाबी, हिरवा , केशरी यांच्या फ्लोरोसंट शेडचा वापर करुन तयार केलेली आहेत.यात शॉर्ट, लाँग आणि स्टँन्ड कॉलर असलेल्या जॅकेटसचा समावेश आहे. साधारण ३००ते ३५० रुपयांपर्यंत ही जॅकेटस आहेत आहेत. याशिवाय साडी नेसणाऱ्यांसाठी अशाच पद्धतीचे ब्लाऊजसुद्धा आहेत . प्लेन साडीवर किंवा मिक्स मॅच करुन नवा लुक हवा असणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. म्हणूनच अशाप्रकारचे ब्लाऊज घेण्यासाठी महिलांची गर्दी दिसत आहे. पुरुषांसाठी पारंपरिक केडिया गरब्यासाठी खास पुरुषांसाठीचा असलेला हा पेहराव असून यावर हाफ आणि लाँग बाह्या असलेले शर्ट आणि त्याखाली घोळदार धोती असते. यातही वैविध्यता आहे. पॅचवर्क, कच्छी वर्क केलेले केडीया आहेत. सिंगल लेअर ,ÞÞडबल लेयर असलेले केडीयांवरचे शर्ट असून यावरच त्यांची किंमत देखील अवलंबून आहे. पुरुषांसाठी ८०० रुपयांपासून केडीया आहेत.कपड्यांची काळजी घेताना घागराचोळी किंवा केडियावर कच्छी भरतकाम , काजकाम केलेले असते,असे कपडे नेहमी ड्रायक्लीन करावेत कपडे वाळवून टाल्कम पावडर घालून मगच कपाटात ठेवावेत. घागराचोळी आणि केडियावर असणारे हुक्स गंजण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा चांगल्या प्रतीचे हुक्स लावून घ्यावेत. लेसचा वापर घागराच्या बॉटमवर करायचा असेल तर खूप वर्क असलेल्या लेसचा वापर करु नये.फिरोजी, लाल, चॉकलेटी ,हिरवा यांसारखे रंग कपड्यावर उतरण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी या रंगाचे कपडे ड्राय क्लीन करुन मगच वापरावे.घागराचोळी : मोठ्यांसाठी - १००० रुपयांपासून ते अगदी २००० पर्यंत , लहानमुलींसाठी २५० ते ५०० रुपयांपर्यतकेडिया : मोठ्यांसाठी ८०० ते १२०० रुपयांपर्यंत, लहान मुलांसाठी-१५० ते २५० रुपयांपर्यंतजॅकेट्स : ३०० ते ५००रुपयांपर्यंत ब्लाऊज : ५०० ते १००० रुपयांपर्यंत