कोपरी येथील ब्रिज गर्डर लॉन्चिंगसाठी ट्रॅफिक ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:07 AM2021-01-23T04:07:37+5:302021-01-23T04:07:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वे येत्या रविवारी रात्री आणि सोमवारी रात्री रोजी कोपरीरोड ओव्हर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वे येत्या रविवारी रात्री आणि सोमवारी रात्री रोजी कोपरीरोड ओव्हर ब्रिजच्या रोड क्रेनद्वारे गर्डरचे कार्य करण्यासाठी ठाणे ते मुलुंड स्थानकांदरम्यानच्या सर्व सहा मार्गांवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेणार आहे. दोन्ही दिवशी मध्यरात्री १.०० ते ४.३० या कालावधीत ब्लॉक घेण्यात येईल.
शीव येथे चारही मार्गावर मध्यरात्री ००.४० ते पहाटे ४.४० पर्यंत आणि अटगाव येथे डाउन मार्गावर सकाळी २.२० ते पहाटे ६.२० या दरम्यान हा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे रविवारी रात्री आणि सोमवारी रात्री गाड्यांच्या वेळापत्रकात बदल तर काही फेऱ्या रद्द हाेतील. दादर ते ठाणे दरम्यान सकाळी ००.४० ते सकाळी ०५.०० या दरम्यान उपनगरी सेवा रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी ००.१५ वाजता सुटणारी कसारा लोकल रद्द राहील. ठाण्याहून ०१.१९ वाजता सुटणारी कर्जतला जाणारी शेवटची लोकल असेल. सीएसएमटी येथून सकाळी ०५.०० वाजता सुटणारी कसारा लोकल पहिली असेल. ठाणे येथून सकाळी ०५.१० वाजता सुटणारी पहिली लोकल कसारासााठी असेल. कर्जत येथून सकाळी ०३.४१ वाजता सीएसएमटीसाठी असेल. टिटवाळा येथून सीएसएमटी येथे जाणारी पहिली लोकल सकाळी ०४.३२ वाजता टिटवाळा येथून सुटेल.
२३ जानेवारी रोजी सीएसएमटी येथून रात्री ११.२० वाजता टिटवाळासाठी जाणारी लोकल कसारापर्यंत चालविण्यात येईल. सीएसएमटी येथून अंबरनाथसाठी शेवटची लोकल २४ जानेवारी रोजी सकाळी ००.०५ वाजता असेल. २३ जानेवारी रोजी सीएसएमटीसाठी शेवटची लोकल खोपोली येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल.
२४ जानेवारी रोजी कसारासाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री ००.०५ वाजता सुटेल आणि सर्व स्थानकांवर थांबेल. सीएसएमटी येथून शेवटची लोकल कुर्ल्यासाठी २५ जानेवारीला सकाळी ००.३१ वाजता सुटेल. २४ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी शेवटची लोकल बदलापूर येथून रात्री ११.३१ वाजता सुटेल.
..................................