मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी मार्गाचा वापर करा

By सचिन लुंगसे | Published: August 25, 2022 06:37 PM2022-08-25T18:37:06+5:302022-08-25T18:37:30+5:30

या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी  मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आले आहे.

Traffic block on Mumbai-Pune Expressway tomorrow; Use an alternate route | मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी मार्गाचा वापर करा

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी मार्गाचा वापर करा

googlenewsNext

मुंबई -यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ ( मुंबई दिशेने ) ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्यावतीने दिनांक २६.०८.२०२२ रोजी करण्यात येणार आहे. या कारणास्तव दुपारी १२.०० ते १४.००  या कालावधीत वाहतूक किवळे ते देहु रोड मार्ग ( राष्ट्रीय महामार्ग ४८ ) सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.

या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी  मार्गाचा वापर करावा तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई –पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा  दुरध्वनी  क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.

Web Title: Traffic block on Mumbai-Pune Expressway tomorrow; Use an alternate route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.