महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 09:44 AM2023-12-03T09:44:39+5:302023-12-03T09:45:14+5:30
चैत्यभूमी, शिवाजी पार्क दादर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीत विविध बदल केले आहेत.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी डिसेंबरपासून चैत्यभूमी, दादर परिसरात येणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. चैत्यभूमी, शिवाजी पार्क दादर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीत विविध बदल केले आहेत. हे बदल ४ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून ७ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील.
एक दिशा मार्ग :
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यंत वाहतुकीकरिता बंद राहील. एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगीज चर्च जंक्शनपर्यंत एक दिशा मार्ग राहील. तर रानडे रोड - ज्ञानेश्वर मंदिर रोड -जांभेकर महाराज रोड -केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर -एम. बी. राऊत मार्ग हा वाहतुकीकरिता बंद राहील.
टी. एच. कटारिया मार्ग हा एल.जे. रोडच्या शोभा हॉटेल जंक्शन ते आसावरी जंक्शनपर्यंत वाहतुकीस बंद राहील.
अवजड वाहनांना प्रतिबंध:
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या माहीम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन
एल.जे. रोडच्या माहीम जंक्शन ते गडकरी जंक्शन
गोखले रोडच्या गडकरी जंक्शन ते धनमिल नाका
सेनापती बापट मार्गाच्या माहीम रेल्वेस्थानक ते वडाचा नाका
दादर टी. टी. सर्कल ते टिळक ब्रिजवर, वीर कोतवाल गार्डन ते संपूर्ण एन. सी. केळकर रोड