Join us

आग लागल्याने वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:04 AM

मुंबई : डायमंड कार्यालय येथे रविवारी दुपारी आग लागल्याने क्रांतिवीर लहुजी साळवे मार्ग - सी क्रॉस मार्ग ते सिप्झ ...

मुंबई : डायमंड कार्यालय येथे रविवारी दुपारी आग लागल्याने क्रांतिवीर लहुजी साळवे मार्ग - सी क्रॉस मार्ग ते सिप्झ गेट क्रमांक १ दरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. बसमार्ग क्रमांक १८१, ३१२, ४१५, ३०७, ४९६, ५२२, ४९६, ७०६ ई नेल्को, पूनम नगर, दुर्गा नगर, कमल अमरोही स्टुडिओमार्गे १२.५०पासून तात्पुरते वळविले होते. दुपारी दोनच्या आसपास येथील वाहतूक पूर्ववत झाल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले.

-----------------

अखेर प्रलंबित मेट्रोचे काम सुरू

मुंबई : आदर्श नगर लाईन २ अ मेट्रो रेल वायडक्ट बांधकाम ३० संरचनामुळे ३ वर्षांपासून प्रलंबित होते. आता एमएमआरडीएने सदर बांधकाम जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे मेट्रो कामाचा मार्ग माेकळा झाला असून काम सुरू झाले आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणकडून देण्यात आली.

-----------------

वडाळा मोनोरेल डेपोला भेट

मुंबई : एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी नुकतीच वडाळा मोनोरेल डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी सेवासुधार व एकूणच देखभालीशी संबंधित विविध बाबींवर मोनोरेलच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.

-----------------

जाेगेश्वरीत मोफत धान्य वाटप

मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील मोहन चव्हाण यांनी गेल्यावर्षीच्या टाळेबंदीमध्ये एक हजारपेक्षा अधिक कुटुंबीयांना धान्य वाटप केले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संजय गांधी नगर जोगेश्वरी पूर्व परिसरातील ६००पेक्षा अधिक कुटुंबीयांना मोफत धान्याचे वाटप केले. जोगेश्वरी परिसरातील महिला, रिक्षाचालकांना सहाय्य केले जात आहे.

-----------------