दहिसर चेकनाका - बोरीवली मार्गावर वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:09 AM2021-09-15T04:09:48+5:302021-09-15T04:09:48+5:30
मुंबई : दहिसर चेकनाका - बोरीवली मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होत आहे. सामान्यतः संध्याकाळच्या वेळी वाहन चालक तसेच ...
मुंबई : दहिसर चेकनाका - बोरीवली मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होत आहे. सामान्यतः संध्याकाळच्या वेळी वाहन चालक तसेच प्रवाशांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. बोरीवली तसेच दहिसर या भागात पोहोचण्यासाठी ४० मिनिटे ते एक तासापर्यंतचा वेळ अधिक जात असल्याने प्रवाशांना तसेच वाहन चालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
रिक्षा चालक मुकेश साव म्हणाले की, संध्याकाळच्या वेळी ट्राफिक असल्या कारणामुळे त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यतः दहिसर चेकनाका येथे रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे जास्त ट्राफिक होते; पण करणार काय? मजबुरी आहे. गाडी तर चालवावी लागते.
पावसाच्या काळात रस्त्यांची अजून दुर्दशा होते. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने गाडी चालविण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमध्ये प्रामुख्याने पाणी साचते. त्यामुळे गाडी चालविताना वाहन चालकांना गाडी चालविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.
वीरेंद्र सिंग (चालक) म्हणाले, सध्या पावसाच्या काळात आम्हाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमधून वाट काढत गाडी चालविताना त्रास होतो. दहिसरपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. या रोडवर पार्किंगसाठीची व्यवस्थादेखील नाही. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी गाड्या पार्क केलेल्या दिसतात. याचा त्रास पायी प्रवास करणाऱ्यांनादेखील होत आहे. सध्या गणपती उत्सव असल्याने जागोजागी ट्राफिक दिसत आहे.