निर्बंध शिथिल होताच रस्त्यावर वाहनांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:40+5:302021-06-02T04:06:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : निर्बंध शिथिल झाल्याच्या बातम्या येताच, मुंबई-ठाणे परिसरातील रस्त्यांवरील वाहन संख्येत कमालीची वाढ दिसू लागली ...

Traffic congestion as soon as restrictions are relaxed | निर्बंध शिथिल होताच रस्त्यावर वाहनांची गर्दी

निर्बंध शिथिल होताच रस्त्यावर वाहनांची गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : निर्बंध शिथिल झाल्याच्या बातम्या येताच, मुंबई-ठाणे परिसरातील रस्त्यांवरील वाहन संख्येत कमालीची वाढ दिसू लागली आहे. या विनाकारण रस्त्यांवर आलेल्या वाहनांना चाप बसावा म्हणून वाहतूक पोलिसांनी दोन्ही मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी लावली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले.

मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मंगळवारी वाढली. लोकल बंद असल्याने रस्ते मार्ग हा पर्याय आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वच प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबईत विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून, वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. योग्य कारणासाठी लोक घराबाहेर पडले आहेत का, हे पाहण्यासाठी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात आल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. नाकाबंदी केल्याचा परिणाम म्हणजे मंगळवारची वाहतूक कोंडी ही सोमवारच्या तुलनेत कमी होती. योग्य कारण नसेल तर वाहनांना घरी परत पाठवले गेले. पोलिसांनी कडक तपासणी केली. यामध्ये रुग्णवाहिकेचाही समावेश होता, असेही ते म्हणाले.

नाकाबंदी, वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

दहिसर टोल नाक्यावर ४ किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. वेस्टर्न एक्स्प्रेस-वेच्या प्रत्येक उड्डाणपुलापूर्वी आणि नंतर नाकाबंदी होती. १०० मीटर टोलचा नियम कुठे आहे असा सवाल एका वाहनचालकाने यावेळी विचारला. दहिसर आणि मीरा रोड ४५ मिनिटे वाहतूक कोंडीत अडकलो, जर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकत असेल तर काय फायदा, असा सवाल मितेश शाह यांनी केला. मुलुंड टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडी झाली होती. एक-दोन तास वाहतूक कोंडीत गेले. कामे कधी करणार, कमीत कमी रेल्वे प्रवासाची मुभा द्या, असे एका वाहनचालकाने म्हटले आहे.

Web Title: Traffic congestion as soon as restrictions are relaxed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.