एसटी महामंडळाचे आर्थिक चाक खोलात!, ग्रामीण भागातील प्रवाशांनीही फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:33 AM2018-03-15T05:33:16+5:302018-03-15T05:33:16+5:30

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीद वाक्यासह धावणाऱ्या एसटी महामंडळाचे चाक खोलातच जात असल्याचे चित्र आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही विविध कारणांमुळे एसटीच्या प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे.

The traffic congestion of the ST corporation is missing! | एसटी महामंडळाचे आर्थिक चाक खोलात!, ग्रामीण भागातील प्रवाशांनीही फिरविली पाठ

एसटी महामंडळाचे आर्थिक चाक खोलात!, ग्रामीण भागातील प्रवाशांनीही फिरविली पाठ

googlenewsNext

मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीद वाक्यासह धावणाऱ्या एसटी महामंडळाचे चाक खोलातच जात असल्याचे चित्र आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही विविध कारणांमुळे एसटीच्या प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. २०१६-१७ या वर्षात प्रवासी संख्येत १.४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. परिणामी, प्रवासी महसूलही घटला आहे. २०१५-१६ मध्ये ७,०६९.२८ कोटी रुपये असलेला महसूल २०१६-१७ मध्ये ६,७९०.९७ कोटी रुपये एवढा खाली आला आहे.
राज्याने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात, एसटी महामंडळाचे आर्थिक चााक खोलात असल्याचे उघडकीस आले आहे. एसटी महामंडळाने २०१५-१६ मध्ये राज्यभरात सरासरी ६७.११ लाख प्रवाशांची वाहतूक केली होती. २०१६-१७ या वर्षात प्रवासी संख्येत १.४ टक्क्यांनी घसरण झाली. परिणामी, १६-१७ मध्ये हा आकडा सरासरी ६६.९५ लाखांपर्यंत आला. डिसेंबर २०१७ मध्ये यात आणखी घट झाल्याने, हा आकडा ६६.३१ असल्याचे पाहणी अहवालात दिसून आले.
एसटी महामंडळाने डिसेंबर २०१७ पर्यंत ५५.८२ लाख किलोमीटर प्रवासी टप्पा पार केला, तर २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ५७.३९ लाख किलोमीटर इतके होते, तर २०१६-१७ मध्ये ५६.६१ लाख किमी वाहतूक करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील डिसेंबर २०१७पर्यंत रोज सरासरी १६ हजार ४४७ एसटी बस धावतात. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित शिवशाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन हजार शिवशाही बांधण्यासाठी कोट्यवधींचे कंत्राट देण्यात आले. १६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत राज्यभरातील ११५ महत्त्वाच्या मार्गांवर शिवशाही धावू लागली. मात्र, तिच्या फेºयांची वेळ सोयीची नसल्याने प्रवाशांनी शिवशाहीकडेही पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
शटल सेवांवर भर देणार
एसटी महामंडळ प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन उपक्रम राबवित आहे. यात स्थानक पुनर्बांधणी, मोफत वाय-फाय, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही या उपक्रमांचा समावेश आहे. आरामदायी आणि वातानुकूलित शिवशाहीमुळे महामंडळाच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचा लाभ मिळत आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी शटल सेवांवर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, अनधिकृत प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- रणजीत सिंह देओल, एसटी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
राज्याने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात एसटी महामंडळाचे आर्थिक चाक खोलात असल्याचे उघडकीस आले. महामंडळाने २०१५-१६ मध्ये सरासरी ६७.११ लाख प्रवाशांची वाहतूक केली. २०१६-१७ या वर्षात प्रवासी संख्येत १.४ टक्क्यांनी घसरण झाली.
२०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८
(डिसेंबर १७ पर्यंत)
ताब्यातील एकूण वाहने १८,५१४ १८,७१० १८,५६९
रोज धावणाºया एसटी १६,९८१ १६,८३४ १६,४४७
रोज वाहतूक किमी (लाख) ५७.३९ ५६.६१ ५५.८२
रोज प्रवासी सरासरी संख्या (लाख) ६७.११ ६६.९५ ६६.३१
एसटी कर्मचाºयांची संख्या १,०५,६७९ १,०३,०४३ १,०१,३७३
महसुलातील घट ( कोटींमध्ये )
२०१५-१६ २०१६-१७
प्रवासी महसूल ७,०६९.२८ ६,७९०.९७
इतर महसूल २१५.२० २६५.२५
एकूण ७,२८४.४८ ७,०५६.२२

Web Title: The traffic congestion of the ST corporation is missing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.