Join us

वाहतूक कोंडीने अडविली ‘बेस्ट’ची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 2:24 AM

उत्पन्नात वाढ होण्यासाठी धडपडणाऱ्या बेस्ट उपक्रमाची वाट वाहतूक कोंडीने अडविली आहे.

मुंबई : उत्पन्नात वाढ होण्यासाठी धडपडणाऱ्या बेस्ट उपक्रमाची वाट वाहतूक कोंडीने अडविली आहे. मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बेस्टच्या बसगाड्यांना लेटमार्क, कमी फेºया होणे, परिणामी बस थांब्यावर ताटकळलेले प्रवासी निघून जाणे अशा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचा आर्थिक फटका बेस्ट उपक्रमाला बसत असल्याचे वास्तव बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी बेस्ट दिनाच्या पूर्वसंध्येला मांडले.बेस्ट उपक्रमामार्फत दरवर्षी ७ आॅगस्ट रोजी ‘स्थापना दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांची माहिती देताना बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर आणि महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी ही खंत व्यक्त केली. बेस्ट उपक्रमाच्या दररोज पाच लाख कि.मी. बसगाड्या प्रवर्तित करण्यात येतात. मात्र वाहतूककोंडीमुळे ५० हजार कि.मी. प्रवर्तन बेस्ट उपक्रमाला शक्य होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन हजार ३६७ बसगाड्यांचा ताफा आहे. मात्र दररोज सकाळी बस आगाराबाहेर या बसगाड्या काढल्यानंतर वाहतूककोंडीत अडकतात. मुंबईत प्रति एक कि.मी. लांबीच्या रस्त्यांवर सुमारे १३०० वाहने आहेत. त्याचबरोबर रेल्वेने गाड्यांचे डबे नऊवरून १२वर नेल्याने बेस्टचे प्रवासी रेल्वेकडे वळले. याव्यतिरिक्त शेअर रिक्षा, टॅक्सी, अ‍ॅपबेस्ड टॅक्सी सेवा, मेट्रो सेवा अशा पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत असल्याने बेस्टच्या प्रवासी संख्येत घट होऊन उत्पन्नही घटले असल्याची खंत चेंबूरकर यांनी व्यक्त केली.>बेस्टचा ताफाबेस्टकडे सध्या ३ हजार ३३७ बसेस असून त्यात २,७५९ या एकमजली, ४२७ मिडी, ६ इलेक्ट्रिक मिडी, २५ हायब्रीड वातानुकूलित, १२० दुमजली बसगाड्या आहेत.>इंधन दरवाढीचा फटकाइंधनाचे दर, बस गाड्यांचे सुट्टे भाग आणि आस्थापनावर बेस्ट उपक्रमाचा सर्वाधिक पैसा खर्च होत असतो. यामुळे बेस्ट उपक्रमाला मिळणाºया उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. यात गेल्या महिन्याभरात सतत वाढणाºया इंधनाच्या दराने भर घातली आहे.बेस्टच्या दर्शनी बाजूला असलेले इलेक्ट्रॉनिक बोर्ड बंद असणे, कंडक्टरकडे असणाºया ट्रायमेक्स मशीनमध्ये बिघाड, तिकीट प्रणाली सदोष, कमी झालेल्या बसफेºयांमुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे.>आकडेवारी कोटींमध्येवर्ष उत्पन्न खर्च तूट१९८०-८१ ५४.१५ ६६.९० १२.८३१९८७-८८ १२०.४१ १५६.३३ ३५.९११९९७-९८ ५३८.२४ ६४०.४० १०२.१५२००७-०८ ८५४.८८ १२२६.६९ ३७१.८०२०१७-१८ १७५३.५३ २७९९.४४ १०४५.९१

टॅग्स :बेस्ट