भांगवाडीत एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

By admin | Published: January 13, 2015 10:44 PM2015-01-13T22:44:41+5:302015-01-13T22:44:41+5:30

मुरबाडपासून ४० किमी अंतरावर असणाऱ्या आदिवासी भांगवाडी या गावासह परिसरातील लोकसंख्या ७ हजारांच्या आसपास असून या वाडीची बस एसटी महामंडळाने बंद केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

Traffic incident in Bhangwadi due to stop of ST | भांगवाडीत एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

भांगवाडीत एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

Next

शिरोशी : मुरबाडपासून ४० किमी अंतरावर असणाऱ्या आदिवासी भांगवाडी या गावासह परिसरातील लोकसंख्या ७ हजारांच्या आसपास असून या वाडीची बस एसटी महामंडळाने बंद केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
गेल्या आठ वर्षांपासून मुरबाड-भांगवाडी एसटी सेवा बंद केल्याने माळ ग्रामपंचायतीमधील लाकूडपाडा, सुकळवाडी, जांभूळवाडी, मविचीवाडी, वडाचीवाडी, भाल व भांगवाडी अशा ७ गावांची लोकवस्ती ७ हजार आहे. या आदिवासी वाड्यापाड्यांमधील एखादा वयोवृद्ध किंवा लहान मुलगा तसेच गरोदर आजारी पडला तर त्यांना नेण्यासाठी खांद्यावर डोली करून दवाखान्यात जावे लागते. त्यात या वाड्यांना जोडणारा रस्ता पूर्णत: उखडल्याने मोठमोठे दगड बाहेर येऊन खड्डे पडले आहेत. हे खड्डे ग्रामस्थांची डोकेदुखी बनले आहेत. त्यात एसटी सेवा बंद असल्याने ती लवकर चालू करावी, अन्यथा जि.प. व पंचायत समित्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार, असे माजी ग्रा.पं. सदस्य नागो शीद यांनी सांगितले.

Web Title: Traffic incident in Bhangwadi due to stop of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.