Join us

मुंबईत दोन महिन्यांत ८६२ प्रदूषणकारी वाहनांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 10:20 AM

आरटीओकडून १.७० लाखांची दंडवसुली.

मुंबई :मुंबईत होणाऱ्या वायू प्रदूषणासाठी  बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. न्यायालयाने सुनावल्यानंतर आरटीओ विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. 

८ नोव्हेंबर २०२३ पासून १४ जानेवारी २०२४ पर्यंत मुंबईत ८,२९४ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये  ८६२  वाहने दोषी आढळल्याने त्यांच्याकडून १. ७० लाखांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबईत माल वाहतूक वाहनांद्वारे बांधकाम साहित्य वाहतूक करताना आवश्यक दक्षता घेण्यात येत नाही. वाहून नेण्यात येत असलेला माल आच्छादित करण्यात येत नाही, असेही कारवाईदरम्यान आढळून आलेले आहे.

मुंबईत माल वाहतूक वाहनांद्वारे बांधकाम साहित्य वाहतूक करताना आवश्यक दक्षता घ्यावी. 

आरटीओचे आदेश :

माल वाहून नेण्यात येत असलेला माल आच्छादित करावा, असे आरटीओचे आदेश आहेत; पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 

क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक :

 क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक, तसेच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मालाची खडी, सिमेंट, वीट, डबर, वाळू, इत्यादी वाहतूक, तसेच ट्रान्झिट मिक्सरद्वारे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी आरटीओ कार्यालयांना दिले. 

  वायू प्रदूषणाबाबत न्यायालयाने सुनावल्यानंतर परिवहन विभाग आणखी कारवाई वाढवली असून पीयूसी कारवाईबाबत विशेष तपासासाठी मोहीम सुरू केली आहे.  

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस