वाहतूक पोलीस तंदुरुस्त!
By admin | Published: October 1, 2014 01:11 AM2014-10-01T01:11:40+5:302014-10-01T01:11:40+5:30
मुंबईतील वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीसोबतच स्वत:च्या रक्तदाबावरही नियंत्रण मिळवले आहे.
Next
>मुंबई : मुंबईतील वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीसोबतच स्वत:च्या रक्तदाबावरही नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे अतिताणाखाली काम करणारे वाहतूक पोलीस प्रकृतीची उत्तम काळजी घेत असल्याचे स्पष्ट होते.
मुंबईतील 1 हजार 34क् वाहतूक पोलिसांच्या रक्तदाब तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे. तणावपूर्ण परिस्थितीत आणि वाढत्या प्रदूषणात वाहतूक पोलीस काम करतात. त्यामुळे वातावरणातील आद्र्रता व गरम हवेचा पोलिसांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र देशातील सरासरीपेक्षा मुंबईच्या वाहतूक पोलिसांचे आरोग्य चांगले आहे, असे या सव्रेक्षणात निदर्शनास आले आहे. दरम्यान, एकूण 12 आरोग्य शिबिरांत बीएमआय (बॉडी मास इंडेक्स), पीएफटी (पल्म्पेनरी फंक्शन टेस्टिंग), बीपी (ब्लड प्रेशर), रॅण्डम ब्लड शुगर (मधुमेह चाचणी), ईसीजी आणि चालण्याच्या चाचणीचा प्रतिसाद यांचा समावेश होता.
तपासणी करण्यात आलेल्या 1 हजार 34क् पोलिसांपैकी 99 टक्के पोलिसांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले. तर 98 टक्के पोलिसांच्या ईसीजीची चाचणी अनुकूल असून, त्यांचे हृदय उत्तम असल्याचे संस्थेने सांगितले. चालण्याच्या चाचणीत केवळ 78 टक्के पोलीस उत्तीर्ण झाले असून, अनुत्तीर्ण पोलिसांना संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आहारविषयक व व्यायामाबाबत सल्ला दिला आहे. नेपच्यून फाउंडेशन आणि एन्व्हीरॉनमेंटल मेडिकल असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या विविध 12 आरोग्य शिबिरांत ही तपासणी घेण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे आठ तासांपेक्षा अधिक वेळ प्रदूषित वातावरणात उभे राहूनही पोट सुटलेल्या पोलिसांचे प्रमाण केवळ 15 टक्के एवढेच असल्याचे डॉ. के. सी. मोहंती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सुमारे 53 टक्के पोलिसांचा बीएमआय अधिक वाढला, परंतु त्यापैकी बहुसंख्य पोलिसांच्या स्नायूंची क्षमता चांगली आहे.
वजन अधिक असलेल्या पोलिसांची संख्या 15 टक्के असली, तरी त्यांची प्रकृती उत्तम आहे.
मधुमेहाची लक्षणो केवळ 7 टक्के पोलिसांत आढळतात, ते प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. केवळ 2 टक्के व्यक्तींचा ईसीजी अनियमित आढळला.