Join us

मोटारसायकल चालकांना हेल्मेटचे वावडे; वाहतूक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 9:46 AM

वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या ई-चलन कारवाईत सर्वाधिक कारवाया या विना हेल्मेट चालकांवरील आहेत.

मुंबई : वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या ई-चलन कारवाईत सार्वधिक कारवाया या विना हेल्मेट चालकांवरील आहेत. गेल्या पाच वर्षात विना हेल्मेट चालकाविरुद्ध ४० लाख ८१ हजार ५८६ ई-चलन जारी केले आहे. त्यापाठोपाठ विना सीट बेल्ट (९,२४,१०५), ट्रिपल सीट (१ लाख २० हजार ९७०) तर वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या चालकांविरुद्ध ५१ हजार ६६५ ई- चलन बजावले आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक कारवायांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

४०,८१,५८६ रुपये देह मागील पाच वर्षांत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या चालकांकडून वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे.

सक्तीने कारवाईची मागणी कारवाईसाठी स्वतंत्र प्रणाली :

१) गृहविभागाच्या माहितीनुसार, प्रादेशिकपरिवहन अधिकारी (आरटीओ) आणि वाहतुक पोलिस हे वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी चाहन चालक, वाहनांना ई-चलन जारी करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली वापरत आहे.

२) आरटीओ हे नॅशनल इन्स्फॉर्मेटिक्स सेंटर(एनआयसी) यांनी विकसित केलेली प्रणाली वापरत असून, पाहतुक पोलिस हे वाहतुक पोलिस विभागाने स्वतंत्ररित्या प्रणाली वापरतात.

३) तरी देखील दंड भरत नसलेल्या वाहनचालकांना नोटिसा जारी करण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांच्या वतीने नोटिसा जारी केलेल्या वाहनचालकासाठी लोक अदालत ठेवण्यात आली आहे.

तरी देखील दंड भरत नसलेल्यापिरुद्धसक्तीच्या कारवाईसाठी आरटीओकडे वाहनसंबंधित कामासाठी येणाऱ्या चालकांवर कारवाई व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून मागणी करण्यात आली.

सर्वाधिक कारवाया -

वर्ष      ट्रिपल सीट    मोबाईल वापर     विना सीट बेल्ट २०१९    २४२५४           -                           २९६५४ २०२०    २४१५८           -                            ५०९४६ २०२१    २८४६७        ५४४                        ९५१२२ २०२२    १३१६३        २४१२०                    ३४३६३२ २०२३    ३०९२८        २७००१                   ४०५५५१ एकूण    १,२०,९७०   ५१,६६५                 ९,२४,९०५

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस