Join us

मोहरम मिरवणुकीसाठी वाहतूक पोलीस सज्ज; २२ मार्गांवर प्रवेश बंद, १० रस्ते ‘वनवे’, २४ ठिकाणी पार्किंग बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 5:56 AM

मोहरम आणि दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मुंबई : मोहरम आणि दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. रस्त्यांवरील वाहतुकीसह मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरांतील २२ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. १० रस्ते एक दिशा मार्ग (वन वे) करण्यात आले आहेत. शहरातील २४ ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. वाहतुकीतील हे बदल रविवारी दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.दादर येथील वीर सावरकर मार्गावरील लेडी जमशेदजी मार्ग, माहिम जंक्शनला मिळतो, तेथून ते एस. के. बोले मार्गास सिद्धिविनायक मंदिर जंक्शन या मार्गावर बेस्टसह सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद राहणार आहे. रानडे रोडवरील एन. ची. केळकर मार्ग ते वीर सावरकर मार्ग आणि चैत्यभूमीपर्यंत वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. शिवाजी पार्क पथ क्रमांक ३ आणि पथ क्रमांक ४ अंशत: बंद राहणार आहे. टिळक पूल दादर टी.टी. ते कोतवाल गार्डनपर्यंत बंद राहणार आहे, तर कबुतर खान्यापासून एल. जे. रोड (गडकरी चौक) वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. माहीम विभागातील टाकनदास कटारिया मार्ग एल. जे. रोडवरून वीर सावरकर मार्गाकडे पश्चिमेस जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चेंबूर येथील उमरशी बाप्पा जंक्शन ते बसंत पार्क जंक्शनपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दादर विभागातील जे. के. सावंत मार्ग ते एल. जे. रोड वरील पश्चिमेस जाणारा मार्ग एक दिशा राहणार आहे. माहीम येथील कुंभारवाडा जंक्शन ते रॅम्पपर्यंतचा उत्तर वाहिनेने एक दिशा राहील. माटुंगा येथील मंकीकर मार्ग डंकन कॉजवेकडून चुनाभट्टी रेल्वे फाटकाकडे जाणारी वाहतूक एक दिशा राहणार आहे. दादर वीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक जंक्शन ते माहीम जंक्शन, एम. बी. राऊत मार्ग केळुसकर मार्ग ते समुद्र किनारा, रानडे रोड ते चैत्यभूमी, केळुसकर मार्ग (उत्तर आणि दक्षिण) ते समुद्र किनाºयापर्यंत वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे. माहीम जंक्शनपासून सेनापती बापट मार्ग, रूपारेल महाविद्यालय ते सेनापती बापट मार्ग, स्टार सिटी सिनेमा ते जे. के. सावंत मार्गापर्यंत वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.दादर विभागवीर सावरकर मार्ग : सयानी रोड, जंक्शन ते माहीम कॉजवेगोखले मार्ग दक्षिण उत्तरसेनापती बापट मार्ग : सयानी रोड जंक्शन ते मोरी रोडकेळकर मार्ग व टिळक पूलमाहीम विभागएल. जे. मार्ग, मोरी मार्ग, माहीम कॉजवे