ई-चलन वसुलीसाठी वाहतूक पोलीस घरी येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 03:31 AM2020-12-12T03:31:48+5:302020-12-12T03:32:09+5:30

राज्यात ७०० कोटींची ई-चलन थकीत असून, त्यामध्ये मुंबईतील ४० टक्के ई-चलन आहे. ई-चलनची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक पोलीस आता वाहनचालकांच्या घरी जाणार आहेत.

The traffic police will come home to recover the e-challan | ई-चलन वसुलीसाठी वाहतूक पोलीस घरी येणार

ई-चलन वसुलीसाठी वाहतूक पोलीस घरी येणार

googlenewsNext

मुंबई : राज्यात ७०० कोटींची ई-चलन थकीत असून, त्यामध्ये मुंबईतील ४० टक्के ई-चलन आहे. ई-चलनची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक पोलीस आता वाहनचालकांच्या घरी जाणार आहेत.

एका वाहतूक अधिकाऱ्याने  सांगितले की, दंड वसूल करण्यासाठी ते एखाद्याच्या घरी जाऊन त्या व्यक्तीला सर किंवा मॅडम म्हणून संबोधतील.  वाहनचालक दंड भरण्यास तयार असेल, तर कर्मचारी रोख रक्कम गोळा करतील आणि पावती देतील. जर ती व्यक्ती दंड भरू शकली नाही, तर त्याला किंवा तिला लवकरात लवकर तसे करण्याची विनंती केली जाईल.

मुंबईत सुमारे ३१७ कोटी रुपयांची थकीत आहेत, ते वसूल करण्यासाठी वाहतूक पोलीस १५ डिसेंबरपासून मोहीम सुरू करणार आहे.  प्रत्येकी दोन पोलिसांसह ११ पथके स्थापन करण्यात आली आहेत. पोलीस वाहनचालकांना कॉल सेंटरच्या माध्यमातून याची माहिती देणार आहे. चार वर्षांपूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली होती, पण अनेक जण पैसे भरत नाहीत.

Web Title: The traffic police will come home to recover the e-challan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.